घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ६0 टक्के वाढणार-सुभाष कुमार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये वाढीची चिन्हे आहेत. याचा परिणाम लवकरच घरगुती गॅसच्या किमतीवरही दिसून येईल. सरकारकडून या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅसच्या किमती निर्धारित करण्यात येतील. तेल-गॅस खनन क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असलेल्या ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉपोर्रेशनने (ओएनजीसी) म्हटले आहे की, ६0 टक्क्यांपयर्ंत दरांमध्ये वाढ जवळपास निश्‍चित आहे. ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार कंपनीच्या वार्षिक आर्थिक परिणामांची माहिती देताना सांगितले की, जानेवारी-मार्च २0२१ मध्ये ओएनजीसीने ५८.0५ डॉलर प्रति बॅरेलच्या दराने क्रुड ऑईल म्हणजेच कच्चा तेलाची विक्री केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील सुरुवातीच्या सहा महिन्यात क्रूड आणि गॅसच्या किंमती कमी झाल्याने कंपनीच्या महसुलावर परिणाम झाला. मात्र आता किंमती वाढत आहेत. तसेच सरकारने ग्राहकांना देण्यात येणारी सबसीडीही बंद केली आहे.
या सबसीडीचा एक हिस्सा सरकारी तेल कंपनीला उचलावा लागत होता. गेल्या तिमाहीत गॅसच्या किंमती कमी राहिल्या. सरकार दर सहा महिन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती निश्‍चित करते. जानेवारी-मार्च च्या तिमाहीमध्ये गॅसचे दर १.७९ डॉलर प्रति एमएमबीटीयू (प्रति दस लाख ब्रिटिश थर्मल यूनिट) राहिले आहेत.
क्रूडचे दर वाढणे आणि घरगुती उपभोक्त्यांना देण्यात येणारी पेट्रोलियम सबसीडी संपल्या कारणाने मार्च मार्च, २0२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत ओएनजीसीला ६,७३४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कुमार म्हणाले की, कंपनी यावर्षी २९,५00 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!