• Mon. Sep 25th, 2023

गलती से मिस्टेक या गाण्यावर नीतू कपूरचा धमाकेदार डान्स

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनी टीव्हीवर सुरू होणारा रिअँलिटी शो सुपर डान्सर ४ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. यंदा यावेळी सर्व स्पर्धक एकापेक्षा एक परफॉरमन्स देताना दिसतील. या स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून परीक्षक देखील आश्‍चर्यचकित होणार आहेत. या शोमध्ये फिल्ममेकर अनुराग बासू, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे सर्वजण परीक्षकाच्या खुर्चीत बसून स्पर्धकांचे परीक्षण करणार आहेत. तसेच हे तिघे एकमेकांसोबत धमाल मस्ती करतानासुद्धा दिसणार आहेत. यंदाच्या एपिसोडमध्ये ७0 ते ८0 दशकातील काळ गाजवणारी अभिनेत्री नीतू कपूर गेस्ट जज बनून एन्ट्री करणार आहेत. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
सोनी टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नीतू कपूर म्हणतात, ज्या ज्या वेळी या शोमध्ये कुणी पाहुणे येतात, त्या त्या वेळी त्यांच्यासोबत दादा (अनुराग बासू) डान्स करतात. मला दादांचा रिदम खूप आवडतो. मला माझ्या मुलाच्या एका गाण्यावर दादांसोबत डान्स करायचा आहे. अभिनेत्री नीतू कपुरने केलेल्या विनंतीनंतर अनुराग बासू स्टेजवर येतात आणि दोघेही रणबीर कपूरच्या गलती से मिस्टेक या गाण्यावर धमाकेदार डान्स करतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर युर्जस कमेंट्सचा वर्षाव करत असून मोठ्या प्रमाणात लाइक्स दिले आहेत. ज्या संख्येने या व्हिडीओला लाइक्स मिळत आहेत, त्यावरून येणारा एपिसोड पाहण्यासाठी लोकांची किती उत्सुकता असेल, याचा अंदाज येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या वयात नीतू कपूर इतक्या कमाल आहेत, अशी कमेंट एका युजरने दिली. तर आणखी एका युजरने स्वीट नीतू कपूर यांचे कौतुक केले. अशा प्रकारे प्रेक्षक या शोमधला येणार्‍या पुढच्या एपिसोडसाठी बरेच उत्सुक झाले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,