• Sun. May 28th, 2023

गर्भवती महिलांना दिली जाऊ शकते कोरोना लस – डॉ. बलराम भार्गव

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार केला. ही दुसरी लाट ओसरत असतांना देशापुढे आणखी नवीन संकट आले आहे. कोरोनाचा अधिक संक्रमित होऊ शकणारा डेल्टा हा उपप्रकार हा प्रबळ कुळ (डॉमिनंट लायनेज) ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत आयसीएमआरने महत्वाची माहिती दिली आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी देशात सध्या सुरू असलेल्या करोना लसीकरणातबाबत मोठी माहिती दिली. ते म्हणाले, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांना कोरोना लस दिली जाऊ शकते. गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपयुक्त आहे आणि ते केले जावे. आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा, डेल्टा या उपप्रकाराच्या विरोधात काम करते. डेल्टा प्लस सध्या १२ देशांमध्ये आहे. भारतात ४५000 नमुन्यांपैकी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५0 प्रकरणे नोंदविली गेली असून त्यापैकी सर्वाधित २0 महाराष्ट्रातील आहेत.
ते म्हणाले की, आम्ही हे विषाणू वेगवेगळे केले आहेत. तसेच अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टासाठी ज्याप्रकारे परिक्षण केले. त्याप्रमाणेच डेल्टा प्लसवरही तीच चाचणी करत आहोत. ७ ते १0 दिवसांत त्याचा निकाल मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. मुलांना लस देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, अमेरिका हा एकमेव देश आहे. जो यावेळी मुलांना लस देत आहे. अगदी लहान मुलांना या लसची गरज भासणार का हा एक प्रश्न आहे. जोपयर्ंत आमच्याकडे बाल लसीकरणाबद्दल अधिक डेटा नसेल तोपयर्ंत लस मोठ्या प्रमाणात मुलांना देण्याच्या स्थितीत आपण नसू.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *