• Sun. May 28th, 2023

गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावे स्नान..?

काही जणांना अंघोळीसाठी गरम पाणी लागतं, तर काही जणांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडतं. थंड की गरम कोणत्या पाण्याने अंघोळ करावी हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून तर आहेच. मात्र पाण्याचं तापमान आणि आरोग्याचा विचार करता गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे फायदे आहेत.
थंड पाण्याने अंघोळ
करण्याचे फायदे
थंड पाण्यामुळे झोप उडते, ताजंतवानं वाटतं, एक वेगळीच ऊर्जा मिळते. रक्तप्रवाहावर परिणाम होतो, शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. यामुळे तुमची झोप उडते. व्यायाम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो, थकवा दूर होतो. त्वचेला खाज येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने या खाजेपासून मुक्ती मिळते.
गरम पाण्याने अंघोळ
करण्याचे फायदे
वाहतं नाक, डोकं जड होणं अशी फ्लूसारखी लक्षणं असल्यास त्यापासून आराम मिळतो.गरम पाण्यामुळे त्वचेवरील रंध्रे खुली होतात गरम पाण्याने अंघोळ म्हणजे एकप्रकारे मसाज झाला. स्नायूंवरील ताण कमी होतो. शरीराला आराम मिळतो. वेदना कमी करण्यात मदत होते.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करणं हे प्रत्येकाच्या आवडीवर आणि सवयीनुसार आहे. मात्र अगदी कडक आणि अगदी थंड पाण्याने अंघोळ करू नये. फ्लूसारखी लक्षणं असल्याचं गरम पाण्याने अंघोळ करावी, जेणेकरून तुमच्यामधील ही लक्षणं कमी होतील. अशावेळी थंड पाण्याने अंघोळ करू नये नाहीतर लक्षणं अधिक तीव्र होतील.
गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होती. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर तुमच्या त्वचेवर असा फरक जाणवला असेल. त्यामुळे एक्झेमासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणं टाळावं. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉईश्‍चरायझर जरूर लावावं.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *