जिवलग मित्र सोबत असतो तेव्हा कधीच कोणत्याच गोष्टीची भिती वाटत नाही. कधी काय घडेल सांगता येत नाही. जीवनातील प्रवास कधी-कधी खडतर असू शकतो, पण मित्रांच्या मदतीने या खडतर प्रवासामधून मार्ग काढणे सोपे जाते. सध्याच्या काळात जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असताना मित्रांसोबत व्हिडिओ कॉलवर तुम्हाला वाटणारी भिती सांगितली आणि गप्पागोष्टी केल्या तर काहीसे हायसे वाटते. तपस्वी मेहता दिग्दर्शित वूटवरील नवीन ओरिजिनल सिरीज ख्वाबों के परिंदेमध्ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. ही सिरीज मैत्री व आशेला दाखवते. ही बहुप्रतिक्षित ड्रामा सिरीज वूटवर १४ जून २0२१ पासून पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियामधील नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलेली सिरीज ख्वाबों के परिंदे तीन प्रमुख पात्र – बिंदीया, दिक्षित व मेघा यांच्या जीवनांच्या अवतीभोवती फिरते. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अतिउत्साही बिंदीया तिच्या दोन सर्वात विश्वसनीय मित्र दिक्षित व मेघाला तिच्यासोबत मेलबर्नपासून पर्थपयर्ंत महत्त्वाकांक्षी व विलक्षण रोड ट्रिपवर घेऊन जाते. त्यांच्या प्रवासादरम्यान त्या विलक्षण, विनोदी व प्रबळ सहयात्री आकाशला भेटतात. ही ट्रिप प्रत्येकासाठी खूपच खास असते, कारण या प्रवासामधून त्यांना स्वत:चा पुनशरेध घेण्याची आणि एकमेकांचे प्रामाणिक सहयोगी बनण्याची संधी मिळते. या सिरीजबाबत मत व्यक्त करत आशा नेगी म्हणाली, मी टेलिव्हिजनवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा बिंदीयाची भूमिका पूर्णत: वेगळी आहे. मी पटकथा वाचली तेव्हा मला समजले की, माज्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे.
ख्वाबों के परिंदे या सहा भागांच्या सिरीजमध्ये आशा नेगी, मृणाल दत्त, मानसी मोघे आणि तुषार शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. मेलबर्न ते पर्थपयर्ंतची रोड ट्रिप कशाप्रकारे बिंदीया, दिक्षित, मेघा व तुषारच्या जीवनांमध्ये बदल घडवून आणते आणि ते कशाप्रकारे त्यांच्या भावना व्यक्त करतात, वेदनांना भरून काढतात, प्रेमात पडतात आणि त्यांच्या सर्वात भयंकर भितीचे शमन करतात हे या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
‘ख्वाबों के परिंदे’ १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
Contents hide