नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसर्या लाटेचा धोका कायम असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. देशात लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर केला जात आहे. त्यातही बहुतांश रुग्णांना कोविशील्ड दिली जात आहे. याच कोविशील्डच्या दोन डोसच्या वेळापत्रकात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आतापयर्ंत दोनवेळा वाढविण्यात आले आहे. मात्र आता हेच अंतर कमी करण्यात आले आहे. काही विशिष्ट गटांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे या गटांना दुसर्या डोससाठी ८४ दिवस (१२ ते १६ आठवडे) वाट पाहावी लागणार नाही. या गटातील व्यक्ती २८ दिवसांत दुसरा डोस घेऊ शकतील. दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केवळ कोविशिल्डसाठी घेण्यात आला आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कोणाला मिळणार २८ दिवसांत दुसरा डोस?
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करू इच्छिणारे २८ दिवसांनंतर कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात. नोकरी, अभ्यासासाठी परदेशी जाणारे, ऑलिम्पिक टीमचा भाग असणारे कोविशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेऊ शकतील. त्यांना दुसर्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्डची निर्मिती केली जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश कंपनी अँस्ट्राझेनेकाने कोविशील्डसाठी संशोधन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविशिल्डच्या वापरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोविशिल्डची लस घेतलेल्या व्यक्ती जगभरात प्रवास करू शकतात. परदेशी प्रवास करू इच्छिणार्या व्यक्ती २८ दिवसांनंतर कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतील. मात्र इतरांना दुसर्या डोससाठी ८४ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
कोविशिल्ड डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
Contents hide