मुंबई : नेहमी आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारा युट्यूबर भूवन बामच्या आयुष्यात कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. आपल्या आई-वडिलांना गमावणे हे सर्वांसाठीच कठीण असते. कोरोना व्हायरसच्या या लाटेत भूवनने आपल्या आई-वडिलांना गमावले. त्यानंतर आता त्याने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ही भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
भूवन बामने एका महिन्यातच त्याची आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लिहिले, कोरोनामुळे मी माझ्या दोन्ही लाइफलाइन गमावल्या. आई-बाबांशिवाय आता काहीच पूर्वीसारखे वाटत नाही. महिन्याभरातच होत्याच नव्हत झाल आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाले, माझे घर, स्वप्ने, सर्वकाही. माझी आई माझ्याकडे नाही, बाबा माझ्यासोबत नाहीत. आता पुन्हा सर्व सुरुवातीपासून सुरू करावे लागणार आहे. पण माझी आता तशी इच्छाही होत नाही.
आपल्या आई-वडिलांना गमावल्यानंतर भूवनने स्वत:वर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, मी एक चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला का? आता या आणि अशा सगळ्याच प्रश्नासोबत मला जगावे लागणार आहे. त्यांना पाहण्यासाठी मी आणखी वाट नाही पाहू शकत. तो दिवस लवकरच यावा अशी इच्छा आहे.
दरम्यान भूवनच्या मित्रांनी आणि काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याचे सांत्वन केले आहे. र्शिया पिलगावकर, राजकुमार राव, ताहीरा कश्यप, मुकेश छाब्रा, शर्ली सेठीया, दीया मिर्जा यांसारख्या कलाकारांनी भूवनचे सांत्वन करत त्याच्या आई-वडिलांना र्शद्धांजली अर्पण केली आहे. राजकुमार रावने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, तुझे जे नुकसान झाले त्यासाठी मी खूपच दु:खी आहे. तू खूप काही केले आहे. मी माझ्या आई-वडिलांना गमावले आहे. त्यामुळे मी तुला हे नक्की सांगू शकेन की, ते आपल्याला सोडून कधीच जात नाही त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात.
कोरोना व्हायरसमुळे भूवनच्या आई-वडिलांचे निधन
Contents hide