नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४४ वी बैठक शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, अनेक राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. लसीवर जीएसटी कायम राहणार असून रेमडेसिवीरसह कोरोनासबंधित औषधे आणि उपकरणांवरील जीएसटीमध्ये कपात केली जाणार आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, ही बैठक फक्त एका मुद्यावर ही बैठक बोलविण्यात आली होती. जीओएमचा अहवाल ६ तारखेला आम्हाला देण्यात आला. हा अहवाल कोरोनाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्या गोष्टींवर होता. आम्ही हा अहवाल स्वीकारला आहे. त्यात केवळ तीन बदल केले गेले आहेत. हे सप्टेंबरपयर्ंत लागू राहतील. दुसरे म्हणजे, आम्ही जीएमओने शिफारसमध्ये वापरलेल्या विद्युत उपकरणांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपयर्ंत कमी केली आहे. तर कोरोना लसीवरील जीएसटी ५ टक्के कायम राहील.
जीएसटी परिषदेने लसीवर पाच टक्के कर दर कायम ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, केंद्र सरकार ७५ टक्के लस विकत घेईल आणि जीएसटी देखील देईल, परंतु जीएसटीमधून मिळणारे ७0 टक्के उत्पन्न हे राज्यांसह वाटून घेतले जाईल.
कोरोना औषधे-उपकरणांवर जीएसटी कपात, लसीवर कायम
Contents hide