मुंबई: मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी प्रेक्षणीय, स्पृहणीय आणि र्शवणीय अशी सप्तसुरांची मैफिल म्हणजे कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलीय. या सुरेल मैफिलीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी १३ जूनला संध्याकाळ ७ वाजता रंगणार आहे.
महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून या स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका सूर नवा ध्यास नवा च्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या. कोरोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठय़ा मेहनतीने सजवला, गाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलंय. अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. पण आता कळणार आहे, या सहाजणींपैकी कुणाचा महागायिका बनण्याचा ध्यास खरा ठरतो. कुणाच्या हाती मानाची सुवर्णकट्यार विराजमान होते आणि कोण ठरतेय, महाराष्ट्राची आशा उद्याची!!
सुरांची खरी कसोटी
सूर नवा ध्यास नवाचं हे चौथं म्हणजेच फक्त गायिकांचं पर्व खूपच खास ठरलं. करोनाच्या कसोटीच्या काळात खूप चिकाटीने आणि धैर्याने सूर नवाच्या संपूर्ण टीमने अथकपणे हा सुरांचा महायज्ञ सुरू ठेवला आणि रसिकजनांना मनोरंजनाची ही संजीवनी दिली. अवघ्या १६ गायिकांबरोबरच हा प्रवास सुरू झाला परंतु हे सोळाही सूर महाराष्ट्राच्या कानाकानांत, मनामनांत गुंजत राहिले. या गायिकांच्या सुरेल गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं, गायिकांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. आता अल्पावधीत महाराष्ट्राच्या लाडक्या ठरलेल्या या सहा गायिका सज्ज झाल्या आहेत, महाअंतिम सोहळ्यासाठी. ही चुरस खूप उत्कंठा वाढवणारी असणार आहे. सुरांची खरी कसोटी इथे लागणार आहे.
या रंगतदार महाअंतिम सोहळ्यात सूर नवा ध्यास नवाचे लोकप्रिय कॅप्टन्स महाराष्ट्राचा लाडका रॉकस्टार संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय संगीताचा वारकरी महेश काळे यांचीही अदाकारी रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच या पवार्चा संगीत समुपदेशक, गायक, संगीतकार अजित परब, तरूणांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर यांचे भन्नाट परफॉर्मन्स या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत.
कोण ठरेल महाराष्ट्राची महागायिका ?
Contents hide