सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात दुर्मिळ असा मासा सापडला आहे. सकरमाऊथ प्रजातीचा हा मासा असून हेलिकॉप्टर प्रमाणे माशाची रचना असल्याने याला गावठी भाषेत हेलिकॉप्टर मासा म्हणून संबोधले जाते. एका मच्छीमार करणार्याला मासेमारी करताना हा हेलिकॉप्टर मासा सापडला आहे.
पावसाळा सुरू झाला असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नदीमध्ये मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. लालसर पाण्यात अनेक प्रकारचे मासे सध्या सापडत आहेत. वेगवेगळ्या प्रजातीचे हे मासे पावसाळ्यात सापडतात आणि अशाच एक वेगळ्या जातीचा मासा सध्या सांगलीच्या कृष्णा पात्रामध्ये आढळून आला आहे. हरिपूर येथील विकास नलावडे या मच्छीमाराला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मासेमारी करताना दुर्मिळ असा सकरमाउथ कॅटफिश आढळून आला आहे. याला प्लॅकोस्टोमस किंवा प्लेको म्हणूनही ओळखले जाते. तर हेलिकॉप्टर प्रमाणे हुबेहुब अशी या माश्याची रचना असल्यामुळे याला गावठी भाषेत हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखले जाते. अत्यंत देखण्या स्वरूपाचा हा मासा फिश टँकमध्ये पाहायला मिळतो.
कृष्णा नदीत सापडला हेलिकॉप्टर मासाअमेरिकेच्या नद्यातील प्रजातीसकरमाउथ कॅटफिश हा मूळ साऊथ अमेरिकेतील नद्यातील प्रजाती आहे. कॅटफिशच्या लॉरिकेरिडे कुटुंबातील सदस्यांचे सामान्य नाव सकरमाउथ कॅटफिश आहे. यामध्ये ९२ पिढ्या आणि ६८0 पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. त्यापैकी काही पाळीव प्राण्यांच्या छंदात प्लॅकोस्टोमस किंवा प्लेको म्हणूनही ओळखले जाणारा हा मासा उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतो. मात्र सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हा मासा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कृष्णा नदीत सापडला ‘हेलिकॉप्टर’ मासा
Contents hide