देवळी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाणपट्टा जमिनी असलेल्या जिल्ह्यामध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्रात २0१८ मध्ये राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. गत १५ वर्षांपासून राज्याच्या शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे बदल तसेच विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी झाली आहे. हा एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प असून त्या माध्यमातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हातील ज्या गावाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आहे गावातील शेतकर्यांना आपण प्रोत्साहित करावे तसेच हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता आपण प्रयत्न करावा. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प हा जिल्हयातील निवडलेल्या गावातील सामुदायीक व वैयक्तीक शेती करणार्याकरिता फायद्याचे असल्याचे खासदार तडस म्हणाले.
कृषी संजीवनी प्रकल्प शेतकर्याच्या फायद्याचा
Contents hide