हिंगणघाट : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून वडकीकडे जाण्यास निघालेल्या झायलो कारच्या चालकास पहाटे हवेच्या झुळकेने लागला डोळा. त्यामुळे झायलो गाडी अनियंत्रित होऊन राष्ट्रीय महामार्गावरील द्विभाजक ओलांडून पलीकडे जाऊन एसटी बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात झायलो कारची मोठी तोडफोड झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता दारोडा शिवारात घडली. या अपघातात एस.टी. बसही क्षतिग्रस्त झाली. मात्र, त्यामधील प्रवाशांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.
खापा (नागपूर) येथून वडकीकडे जाण्यासाठी झायलो गाडीचा चालक राजेंद्र कांबले हा खापा गावावरून प्रवासाला निघाला. सोबत कारमध्ये संजीवन गनावरसिंग यांचेसह दोघे कारमध्ये होते. राष्ट्रीय महामार्गावरून दारोडा शिवारात आले असता राजेंद्र कांबळे यास पहाटे वाहणार्या हवेची झुळक आली. यावेळी चालकाच्या हातातील कार अनियंत्रित होऊन महामार्गावरील द्विभाजक पार करून रस्त्याच्या दुसर्या बाजूला गेली. त्याचवेळी राळेगाव येथून विरुद्ध दिशेने हिंगणघाटकडे जाणार्या एसटी बस क्र. एमएच 0७ सी-९0८३ ही महामंडळाची बस प्रवाशासह आपल्या गतीने तेथून प्रवासरत होती. झायलो कार महामार्गावरील दुसर्या बाजूवरून या बाजूला आल्याने एसटी चालक इमरान खान अफसरखान याने प्रसंगावधान साधित एसटी बस जागीच थांबविली. त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मसराम, सोनपितळे तसेच पोलिस कर्मचारी अजय वानखेडे, राहुल गिरडे, गणेश मेर्शाम, प्रफुल्ल चदनखेडे आदी करीत आहेत.
कारच्या गाडीचालकाचा डोळा लागल्याने अपघात
Contents hide