• Fri. Jun 9th, 2023

करीनाचा ड्रेस पाहून भडकला होता सैफ.!

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर तिच्या खास स्टाइलसाठी कायमच ओळखली जाते. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करीनाच्या फॅशनमध्ये बदल झालेला नाही. करीना तिच्या खास ड्रेसिंग स्टाइलमुळे कायम चर्चेत असते. गरोदरपणातही करीनाने तिच्या खास ड्रेसिंगने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ अली खान तिच्यावर चांगलाच भडकला होता.
अभिनेत्री करीना कपूर विरे दी वेडिंग सिनेमाच्या एका प्रमोशनसाठी तयार झाली होती. यावेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ चांगलाच भडकला. एवढेच नाही तर त्याने करीनाला कपडे बदलून दुसरा ड्रेस घालण्यास सांगितले होते. करीना कपूरने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.
२0१८ सालात करीना वीरे दी वेडिंगमध्ये झळकली होती. तैमूरच्या जन्मानंतर करीनाने या सिनेमातून कमबॅक केले होते. या सिनेमाच्या एका म्युझिक इव्हेंटला करीना एका ब्लॅक ड्रेसमध्ये पोहचली होती. ब्लॅक करलचा स्कर्ट आणि टॉप तसेच त्यावर ओव्हर कोट असा करीनाचा ग्लमरस लूक इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी अनेकांनी करीनाचे कौतुक केले. मात्र जेव्हा करीना घरी पोहचली तेव्हा सैफ मात्र तिचा ड्रेस पाहून नाराज झाला होता. एका रेडिओ स्टेशनवर दिलेल्या मुलाखतीत करीनाने इव्हेंटनंतर घडलेला किस्सा शेअर केला होता. ती म्हणाली, ब्लॅक ड्रेसमध्ये मी घरी पोहचले तेव्हा सैफ अली खानचा चेहरा पाहण्यासारखा होता. तो म्हणाला, हे काय घातलंय. जा आणि आताच्या आता हे कपडे बदल आणि काही तरी साधे कपडे घालून ये. करीनाच्या ड्रेसवर सैफने अशी प्रतिक्रिया दिल्यांचे ती म्हणाली. यावर करीनाने सैफला उलट सवाल विचारला होता. ती म्हणाली, या ड्रेसमध्ये काय आहे. तू छान दिसतेयस असे सगळे म्हणत होते. असे म्हणत करीनाने इव्हेंटचे काही फोटो सैफ अली खानला दाखवले. हे फोटो पाहून मात्र करीना सुंदर दिसत असल्याचे सैफ म्हणाला होता. करीना कपूरने स्वत: हा संपूर्ण किस्सा शेअर केला होता.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *