औरंगाबाद : केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाराच्या ‘स्मार्ट सिटी बस’ने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अँवॉर्डस-२0२0 जिंकल्याची घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी केली. हा पुरस्कार पटकवणार्या औरंगाबादने सूरत आणि अहमदाबाद सारख्या शहरांना मागे टाकले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिर्शा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम कार्यक्रमास व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाली होती. यावेळी औरंगाबाद येथील माझी स्मार्ट बसने देशात अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अँवॉर्डस २0२0 जिंकल्याची घोषणा केली आहे. पुरस्कार बद्दल बोलताना मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीम चे अभिनंदन केले आणि यशस्वीतेसाठी सर्व भागधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. स्मार्ट बससाठी पुरस्काराचे श्रेय औरंगाबादमधील नागरिकांनाच आहे. त्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा व स्मार्ट बसच्या डिजीटल सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी २0१९ मध्ये माझी स्मार्ट बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. १00 बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प ३२ मार्गांवर पोहोचतो. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल २२ हजार किलोमीटरचे अंतर व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण ५२ लाख किलोमीटर धावताना ८७ लाखाहून अधिक प्रवाशांना सेवेचा लाभ दिला आहे. जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असताना स्मार्ट सिटी बसने एका दिवसात १५ हजार प्रवाशांना सेवा दिली आहे. तर सर्व बसेस कार्यरत असल्यास ही संख्या २५ हजार पयर्ंत वाढेल.
(Images Credit : Lokmat)
औरंगाबादची ‘माझी स्मार्ट सिटी बस’ देशात अव्वल
Contents hide