• Tue. Jun 6th, 2023

एसटीला मिळणार ६00 कोटी रुपये; अनिल परब यांची घोषणा

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळालाही या काळात मोठं नुकसान सहन करावे लागले. या पार्श्‍वभूमीवर आता राज्य शासनाने मोठी घोषणा करत एसटी महामंडळ आणि कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे.
आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासन ६00 कोटी रुपयांची मदत देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अँड अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचार्‍यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसर्‍यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी फक्त ५0 टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती.
त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या बाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचार्‍यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६00 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला मा. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष् व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *