• Sat. Sep 23rd, 2023

एक लाख ‘फ्रंटलाईन’ योद्धा तयार करणार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी एक लाख फ्रंटलाइन वॉरियर्सनी तयार करण्याची मोहीम आजपासून सुरू होत आहे. २१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यास सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल असे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते. देशभरातील एक लाखांहून अधिक कोव्हिड वॉरियर्सनी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कोविड योद्धांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अँडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना ३.0 अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण रु. २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी, २१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्याचे सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणार्‍या रुपामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात हे आपण पाहिले आहे. हा विषाणू अजूनही आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक उपचार पद्धती आणि प्रत्येक शक्यतांसह आपल्याला आपली तयारी अधिक वाढवावी लागेल. या साथीने वारंवार जगाची, प्रत्येक देशाची, संस्थाची, समाजाची, कुटुंबातील माणसांच्या र्मयादांची परीक्षा घेतली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,