पुणे : आषाढी वारीचा तिढा सुटलेला आहे. आता १0 मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू -आळंदीत प्रस्थानासाठी शंभर वारकर्यांना परवानगी दिली आहे. तर प्रस्थान सोहळ्यात ५0 वारकर्यांना परवानगी देण्यात आली, अशी माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आळंदीत प्रस्थानासाठी रवाना होतील. मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात ५0 वारकर्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षीही पालखी सोहळा बसमधूनच होणार आहे. पंढरपूरपयर्ंत पायी वारी यावर्षीही होणार नाही. मात्र यावर्षी दोन बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत.
इतर वारकरी मात्र दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. मंदिर अन्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल, असा निर्णय घेतला आहे.
आषाढी वारीचा तिढा सुटला; १0 मानाच्या पालख्यांना परवानगी
Contents hide