आर्णी:आर्णी शहरात स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळत जम्बो कार्यवाही करीत ३७ लक्ष रुपयाचा गुटखा दिनांक २१ जून रोजीा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील डोंगा कॉलनी येथील सना एम्पोरियम व कुर्हा रोड वरील एका गोडाउन वर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या सोबतच कापेश्वर फाट्याजवळ गुटख्याने भरलेला टाटा ११0९ ट्रक पकडला आहे. यामध्ये एकूण २९ लक्ष ८१ हजार ६00 रुपयांचा गुटखा व ११0९ ट्रक क्र एमएच 0७ सी ५६९४ किंमत अंदाजे ८ लक्ष असे एकुण ३७ लक्ष ८१ हजार ६00 रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. आरोपी नामे आरिफ रऊफ बैलिम (वय २९) रा. आर्णी,आतिश शालिकराम कोडापे (वय २३), शेख महेबुब शेख सादिक (वय ३४), शेख सलीम शेख गफुर (वय ३८) सर्व रा. शास्त्री नगर आर्णी या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही अप्पर पोलिस अधिक्षक धरणे साहेब,स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली,विवेक देशमूख सहाय्यक पोलिस निरिक्षक, योगेश रंधे सहाय्यक पोलिस निरिक्षक, विशाल भगत, उल्हास कुरकुटे,उमेश पिसाळकर, बबलू चव्हाण, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले,यशवंत जाधव, सुधीर पिदुरकर, प्रफुल दडवी यांनी केली आहे. तसेच जप्त केलेला सम्पुर्ण मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखे ने अन्न व प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला असुन वरील चारही आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये आर्णी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्णीत ३७ लाखांचा गुटखा जप्त
Contents hide