नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठे आरोग्यविषयक संकट उभे राहिले असताना त्याचा परिणाम म्हणून त्यापाठोपाठा देशावर आर्थिक संकट देखील ओढवले आहे. या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना सोमवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण आठ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी ५0 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यासोबतच पीएफ संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी १ लाख १ हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी कोरोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ५0 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६0 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधांसाठी ५0 हजार कोटी-अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Contents hide