आता लर्निंग लायसन्ससाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही

मुंबई : कोरोनामुळे कार्यालये बंद असल्याने आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर र्मयादा येत असल्याने अनेकांना लनिर्ंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोध महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लनिर्ंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसे आदेश राज्यातील ५0 आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे लनिर्ंग लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना आता आरटीओमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना लनिर्ंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली. लनिर्ंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लनिर्ंग लायसन्स दिले जाते. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. कोरोना लॉकडाउनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.
राज्यात आता लनिर्ंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. परिवहन विभागाने राज्यातील ५0 आरटीओ कार्यालयाना मंगळवारी तसे आदेश दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणार गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल. त्याचबरोबर कर्मचार्‍यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल, असे ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
राज्यात परिवहन विभाग वर्षाला २0 लाख लनिर्ंग लायसन्स वितरित करतो. इतक्याच संख्येने कार आणि दुचाकीची नोंदणी केली जाते. लायसन्स आणि वाहन नोंदणी करण्यासाठी देशभरात एनआयसी आणि सारथी या दोन्ही संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात आलेले असल्याची माहितीही अधिकार्‍यांनी दिली.
या निर्णयामुळे काय फायदा होणार?
लनिर्ंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे त्यात माहिती भरावी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. मात्र, नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे. घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आल्याने बर्‍याच गोष्टी सोप्या होणार आहेत. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना पर्याय उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!