• Tue. Jun 6th, 2023

अन्यथा..!

फुले, फळे, मेवा, छाया

तो मुक्तहस्ताने देतो;
प्राणवायू उधळून
विषारी वायूंना पितो.
तोच आहे विश्वेश्वर
निसर्गाला तारणारा;
तोच आहे सुखकर्ता
जीवन सुखवणारा.
त्याच्यासम मित्र नाही
आणि नाही नातलग;
त्याचीच करावी पूजा
तोच खरा जीवलग.
करू नकोस मानवा
अशी वृक्षांची कत्तल;
अन्यथा होईल सृष्टी
वाळवंट अन्‌ कबर.
चहूकडे लावू रोपं
त्यांचे करू संवर्धन;
रोपांचे होतील वृक्षं
वृक्षंच अमूल्य धन…!
मिलिंद हिवराळे
बार्शिटाकळी, जि. अकोला
भ्र. 7507094882
ईमेल : milindhiwarale@yahoo.com
………………..

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *