• Sun. Jun 11th, 2023

अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच केला खून

ठाणे : पत्नीच्या अनैतिक संबधांत अडथळा ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या साथीने पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराने पतीचा मृतदेह रिक्षात टाकून पुलाच्या खाली फेकून दिला. तर दुसरीकडे बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात मृतकच्या भावाने देऊन माझ्या भावाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. याच संशयाच्या आधारावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने पत्नीची चौकशी करून तिच्या मोबाइलमध्ये असलेल्या नंबरचे तांत्रिक विेषण केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. लक्ष्मी उर्फ राणी प्रवीण पाटील (२२) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तर अरविंद उर्फ मारी रविंद्र राम (२0) असे तिच्या प्रियकराचे नाव असून त्याचा मित्र सनीकुमार रामानंद सागर (१९) याचाही गुन्हय़ात सहभाग असल्याचे उघड झाल्याने तिघांनाही कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तर प्रवीण धनराज पाटील (३0) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.
मृतक प्रवीण हा पत्नीसह डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा गावात राहून एका खाजगी कंपनीत कामाला होता. तर पत्नी रिक्षाचालक असून काही महिन्यापूर्वी तीचे आरोपी रिक्षाचालक अरविंद उर्फ मारी याच्याशी प्रेमसंबंध निर्माण होऊन सूत जुळले. त्यांनतर दोघांमध्ये अनैतिक सबंध निर्माण झाले. याची कुणकुण मृत पतीला लागल्याने त्याने आरोपी पत्नीला संबध तोडण्यास सांगितले. मात्र तिचे व आरोपी अरविंद उर्फ मारीमध्ये अनैतिक सबंध सुरुच होते. त्यातच लक्ष्मी हिचे अनैतिक प्रेमसबंध असून पती प्रवीण आपल्या पत्नीवर संशय घेऊन त्रास देत असल्याने पत्नी आणि प्रियकर व त्याच्या मित्राला २ जून २0२१ रोजी मध्यरात्री रोजी घरी बोलावून त्याला मारहाण करुन बेशुध्द केले. त्यानंतर गळ्यावर वार करून त्याचा घरातच खून केला.
मानपाडा पोलिस ठाण्यात ४ जून रोजी प्रवीण पाटील हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने दाखल केली होती. त्यांनतर त्याची पत्नी लक्ष्मी व इतर नातेवाईकांच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विेषण करुन आरोपी पत्नी लक्ष्मी हिच्याकडे चौकशी केली असता वास्तव्याबाबत खोटी व असमाधानकारक माहिती देत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे तिच्या संपर्कात असलेला तिचा प्रियकर व त्याच्या मित्राकडे चौकशी केली. यात तिघांनी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घरापासून ६0 किलोमीटर अतंरावर असलेल्या कर्जत-बदलापूर मार्गावरील शेलू गावाच्या हद्दीत रिक्षामध्ये घेऊन गेले.
येथील निर्जनस्थळी असलेल्या एका लहान पुलाच्या खाली प्रवीणचा मृतदेह टाकून दिल्याचे अटक आरोपींनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, भूषण दायमा, पोलिस उपनिरीक्षक नितीन मुदमून, मोहन कलमकर, शरद पंजे, दत्ताराम भोसले, या कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हय़ाचा छडा लावला आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *