अनेक जिल्हय़ात निर्बंध होणार शिथिल.?

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे चित्र आहे. दिवसागणिक राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निबर्ंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्हय़ांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसर्‍या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निबर्ंध हटवण्यासंदर्भात आणि दुसर्‍या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निबर्ंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्हय़ांचे पाच गटात वर्गीकरण केले जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्हय़ांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्हय़ांचे वर्गीकरण केले जाते. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट म्हणजेच ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणार्‍या जिल्हय़ांतील निबर्ंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणार्‍या जिल्हय़ातील निबर्ंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
निबर्ंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून दोन आठवडे झाले आहेत. पुढील आठवड्यातील निबर्ंध हटवण्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. यात राज्यातील सर्वच जिल्हय़ांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या पण आता पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट आलेल्या जिल्हय़ांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!