मुंबई: कठीण काळामध्ये आपल्याला कदाचित एकच गोष्ट पुढे जाण्याचे बळ देते आणि ती म्हणजे जगभरामधील शूर हिरोजच्या कर्तृत्वामधून मिळणारी प्रेरणा व त्यांच्या शौर्य व हिंमतीच्या कहाण्या ऐकून मिळणारी ऊर्जा होय. भारतातील पहिले व आघाडीचे समग्र रिअल लाईफ मनोरंजनाचे स्ट्रीमिंग अँप असलेल्या डिस्कव्हरी प्लसने आज भुज: द डे इंडिया शूकचे ट्रेलर प्रदर्शित केले आहे व त्यामध्ये २00१ मध्ये भारताला हादरवून टाकणार्या अतिशय विनाशकारी भूकंपांपैकी एक असलेल्या भुजच्या भूकंपाच्या अनुभवांचे दर्शन घडते. ११ जून रोजी प्रसारित होणार्या या विशेष प्रिमियम डॉक्युमेंटरीमध्ये शौर्य, कर्तृत्व, आश्चर्यकारक प्रकारे वाचवणारे लोक, नशिबाहा शाप, दुर्घटना आणि आशा ह्यांच्या सत्यकथेला उलगडण्यात आले आहे. दिग्गज भारतीय कलाकार, मार्गदर्शक व लेखक अनुपम खेर ह्यांच्या विशेष उल्लेखनीय कथाकथन शैलीमधून ही घटना समोर येते. त्यामध्ये भूकंपामधून वाचलेले लोक, प्रत्यक्षदश्रींचे अनुभव आणि त्या घटनेचे प्रत्यक्ष फुटेज ह्यांचा समावेश आहे. २0 वर्षांनंतर ही प्रिमियम डॉक्युमेंटरी ह्या विनाशकारी विपत्तीच्या घटनाक्रमाचा मागोवा घेते आणि त्यामुळे केवळ भारतामधील भूकंपाबद्दलचा दृष्टीकोनच नाही तर शहरी नियोजन, वैद्यकीय प्रगती आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची निर्मिती होण्याचा घटनाक्रमही समोर आणते. कधीही विसरता न येणारी ही दुर्घटना सविस्तर मांडताना त्यामध्ये त्यातील दृढनिश्चयाच्या प्रेरणादायी कथा व त्यातील विज्ञान हेही समोर येते व त्यामुळे ही फिल्म हृदयद्रावक असली तरी नवीन दृष्टी देऊन जाते.
अनुपम खेर एका नव्या रूपात
Contents hide