पांढरकवडा : पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरी प्रकरणात गुन्ह्याची नोंद होती त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असताच दि. १२ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २0 दुचाकी जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून आणखी शोध सुरू आहे.
आरोपी घाटंजी तालुक्यातील साखरा येथील सागर तुळशीदास भेंडारे (वय २३) राहणार तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ, विजय रामराव दडाजे (वय २३)राहणार साखरा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ, सुनील नामदेव जाधव राहणार साखरा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ, विजय विलास ढोले (वय २६) रा. साखरा ता घाटंजी जि. यवतमाळ, विजय रामदास दळाजे (वय २६)रा. साखरा येथील रहिवासी आहेत. सदर चोरट्यांनी दुचाकी चोरून इतर लोकांना विकल्या होत्या. या सर्व हेराफेरीची माहिती पोलिसांनी आरोपींकडून सखोल चौकशी करून एकूण २0 दुचाकी जप्त केल्या आहे. पांढरकवडा पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार प्रकाश क्षीरसागर यांना या दुचाकी चोरट्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पांढरकवडा पोलिस डी.बी पथक यांना माहीती दिली व त्यानंतर डी. बी. पथक पो.उप नी. संदीप बारिंगे, निलेश गायकवाड, पोहेकॉ, प्रकाश क्षीरसागर पो ना, सुहास मंदावार,सचिन मडकाम, पो कॉ, निलेश निमकर, चंदक मनवर, सचिन काकडे, होमगार्ड आदेश पावडे, सोनू निकोडे, दिनेश देवकर, गोपाल अनाके पथकाने घाटंजी तालुक्यातील साखरा या गावी जाऊन मिळालेल्या माहितीवरून चोरट्यांच्या घरी धाड मारून चार आरोपींना अटक करण्यात आली.
अट्टल दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
Contents hide