• Sun. May 28th, 2023

अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरू झाली नव्या खेळीची समीकरणे!

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणार्‍या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ह्यदेवमाणूस ही चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पवधीतच गावात तो देवमाणूस म्हणून ओळखला जाऊ लागतो. परंतु या देवमाणसाच्या बुरख्याआड अतिशय क्रूरकर्मा लपला आहे, याची कुणालाही कल्पनाही नव्हती. परंतु त्याचा क्रूर चेहरा एसीपी दिव्याने मोठ्या हिकमतीने समोर आणला आहे.
एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत. यासाठी तो डिम्पलची मदत घेतो आहे.
दुसरीकडे सगळे गाव डॉ. अजितच्या मागे उभे राहिले आहे, कारण त्यांच्यासाठी तो देवमाणूस आहे. परंतु एसीपी दिव्यासुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे. तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केले आहेत. हे सर्व पुरावे ती कोर्टात सादर करून अजितने धारण केलेल्या मुखवट्यामागचा खरा आणि क्रूर चेहरा सगळ्या जगासमोर आणण्याचा विडा तिने घेतला आहे.
डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख जाहीर होते. त्याला कोर्टात नेताना पोलीस ठाण्याच्या बाहेर संपूर्ण गाव जमतो. अजित कुमारने स्वत:च केस लढणार असे जाहीर केले. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना आहे. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून तेदेखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्ट केस कशी सरकेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *