चांदूरबाजार : लहान बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना शारीरिक सुदृढ करण्यासाठी, शासनातर्फे अंगनवाडी केंद्रा मधून मोफत पोषण आहार देण्यात येते. यात त्यांना मूगडाळ सह इतरही साहित्य देण्यात येते. मात्र हा पोषण आहार अतिशय निकृष्ठ दर्जाचा,असल्याची तक्रार तालुक्यातील पालकांतर्फे केली जात आहे. लहान वयातच अंगनवाडीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांना शरीर पोषणासाठी, पोषक दाळी सह इतरही पोषण साहित्याचे वाटप केले जाते. यात मुलांना पोषक आहार मिळून बालके सुदृढ व्हावी. हा उदार हेतू शासनाचा आहे. परंतू शासनाचे काही अधिकारी व पूर्वाधार, शासनाच्या या उदात्त हेतूला गाल बोट लावत आहेत. या चिमुकल्याच्या ताटात अतिशय निकृष्ठ दर्जाची मुगदाळ पुरविण्यात येत आहे.परीणामी चिमूकल्यांचा आरोग्याला धोका निर्माण होत आहे. असा आरोप पालकवर्ग तर्फे केला जात आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहे. त्यांच्याच जिल्ह्यात चिमुकल्याना पोषण आहारात, निकृष्ठ दर्जाचे धान्य दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार होत आहे.हा पत्रकार अत्यंत खेद जनक आहे.तालुक्यात एकूण २३६ अंगनवाडी असून त्यामध्ये १४ हजार बालक पोषण आहार आहार घेत आहेत. मात्र पोषण आहारात देण्यात येणार्या निकृष्ट प्रकारच्या मुगडाळी मुळे ,चिमुकले शारीरिक सुदृढ कसे होणार? तसेच शरीरा सोबत बौद्धिक विकासही कसा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या निंदनीय प्रकारामुळे तालुक्यातील पालक वर्गात रोष पाहायला मिळत आहे. बालकांना पुरवण्यात येणार्या धान्या कडे, संबंधित विभागाच्या अधिकर्यांनी जातीने लक्ष ठेवणे गरजेचे असते.
अंगणवाडीत बालकांना निकृष्ट पोषण आहाराचे वाटप.!
Contents hide