Header Ads Widget

आठोनी

बाप ढगातून सांगे
आसु पुसून पुसून  
साऱ्या आठोनी ठेवल्या
कायजात संबावून

येते आठोन सदाई
हातपाय दाबन्याची
तुया कविता ऐकून
रात-रात जागन्याची

कधीमंदी बायन्यानं
मायी काळजो आठोन
आठोनीच्या गठोळ्याचं
घरी बांधजो तोरन

यिन लेका अखोजीले
तुले भातकं घिऊन 
तुया हातानं चारजो
रस चिचोनी पुरन

घरी रागं नोको भरू
माय तुयी लय साधी
समजून लायन्याले 
पुळे घेजो तुया आंदी

जीता ठेवजो रे मले
सदा तुया इच्यारात
एकापरी ठिऊ नोको
माया फोटो देवऱ्यात

लाखमोलं इज्जतीची
बाबु ठेवजो आठोन
मान दिऊन साऱ्याले 
कर जीवनाचं सोनं

- प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या