भस्म करुन शवांना, सरण सुस्त झाले
ढिगाऱ्यात माणसाचे, मरण स्वस्त झाले ।।ध्रु।।
खरी भिती झाली, जिवंत माणसाची
मुडद्याला भिनारांचे, स्मरण उदवस्त झाले ।।१।।
पशु समान आता, मरतात माय बाप
डोळ्यात आटलेले, ते धरण पस्त झाले ।।२।।
कोण पेरतो भावना, जिव्हाळा अंगणात
अविचारी कणसाचे, भरण मस्त झाले ।।३।।
शोक सभा प्राण्यांची, रानात पाहतांना
शोधा गावात माणसे, कारण बेशिस्त झाले ।।४।।
अविचाराच्या गल्लीतला, तो अंधार खोदताना
आंधळ्या सुर्याचे ते, किरण अस्त झाले ।।५।।
- रमेश राऊत (विद्रोही)
भांडेगांव ता. दारव्हा
0 टिप्पण्या