Header Ads Widget

महाकवी वामनदादा कर्डक स्मृतीदिनानिमित्त ऑनलाईन कविसंम्मेलन संपन्न

मुर्तिजापूर : आंबेडकरी विचारांचे महाकवी वामनदादा कर्डक यांचे स्मृतिदिनानिमित्त येथील संबोधी साहित्य संघ,कलाविष्कार बहुद्देशीय संस्था, गझलदीप प्रतिष्ठान, मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ मे२०२१ (शनिवारी)गुगल मीट ॲपवर ऑनलाईन कविसंमेलन संपन्न झाले. या कविसंम्मलनाच्या अध्यक्षस्थानी कवी राजेंद्र भटकर होते. यावेळी सर्वप्रथम प्रा.मुकुंद खैरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर प्रा.राजकन्या खनखने,योगिता वानखडे,सुनिल ठाकुर, डाॅ. नंदकिशोर दामोदर, मिलिंद इंगळे, संदीप वाकोडे, अनंत मावळे, प्रा. प्रमोद राजंदेकर,सुनिता इंगळे यांनी  सामाजिक आशयाच्या व कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर आधारित कविता,गझल सादर केल्या.तसेच सुप्रसिद्ध गायक आदेश आटोटे, डाॅ.सुरेश गाडे यांनी वामनदादांची गीते आपल्या सुरेल आवाजात सादर करून कविसंम्मेलनात रंगत आणली.शेवटी अध्यक्षीय मनोगतामधून कवी राजेंद्र भटकर यांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. तसेच आजच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून कलावंतांनी एकत्र येऊन आपसात संवाद साधला पाहिजे. त्यामुळे एक मानसिक दिलासा तर मिळतोच व विचारांचे आदानप्रदान सुद्धा होते असे विचार व्यक्त करून गुगल मीट च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कविसंम्मेलनाचे कौतुक केले. कविसंम्मेलनाचे संचलन संदीप वाकोडे यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद इंगळे यांनी केले.कविसंमेलन ऐकण्यासाठी प्रा.गोवर्धन इंगोले,नागोराव शेजव, प्रतिक्षा कांबळे,विनोद गहाणे, अजयकुमार इंगोले,गुलाब मेश्राम, विलास वानखडे, गौरव प्रकाशनाचे बंडुकुमार धवणे  आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कविसंम्मेलन पार पाडण्यासाठी तांत्रिक सहकार्य गिरीश वाकोडे याने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या