शब्द मुके झाले
डोळ्यातील अश्रूही
आटून गेले
पाहता पाहता
माझ्या सख्यांचे
डोळे मिटून गेले
सांगा कुणासमोर
दुःख हलके करू
माझे मला
सगळे सोडून गेले........
भावपूर्ण श्रद्धांजली
विनम्र अभिवादन
करतांना
हात थरथरुन आले
डोळ्यांच्या पापण्यात
साहू किती वेदना
तथागता
झरे अश्रुंचे बघ
आटून गेले...…...
कवी लेखक विचारवंत
वकील डॉक्टर
नजरेसमोर होते
पाहता पाहता
काळाने केला घात
एवढी कशी रे
क्रूर नियती
माझे सगळे
आंबेडकरी सैनिक नेले......
हल्ली उघडावच वाटत नाही
वर्तमानपत्राचे पान
व्हाट्सएप फेसबुक
मृत्यूचं भय सभोवती
विझत नाही
सरनाची राख......
ज्यांच्या लिखाणात
ठासून भरलेली
असायची क्रांतीची आग
पेटायच्या
प्रबोधनाच्या शब्द मशाली
आज
नकळत निमूटपणे
न सांगता सोडून जात आहेत
समाजाची आस.....
आमच्या डोळ्यांच्या अश्रूंना
माहीतच नव्हतं रडणं
फक्त माहीत होतं
लढणं
आज मात्र अश्रूना
नाही रोखणार
करू दे अश्रूंना
मोकळी वाट
माझ्या लढवय्या
भीमाच्या लेकरांसाठी .........
- राजेंद्र क. भटकर
बडनेरा ( 9011327691 )
0 टिप्पण्या