Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

रुग्णसेवेतील एक कणखर नेतृत्व-अभिलेश देशमुख

       माणसातला देव माणूस..! सलाम दादा आपल्या कार्यास. मूळचे तिवसा तालुक्यातील सातरगाव येथील रहिवासी.तुमच्या कार्याचे सातरगाव ते मुंबई अविरत रुग्णसेवेचे १५ वर्ष. स्वतःचे शारीरिक अपंगत्व बाजूला सारून स्वतः च्या आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता आजच्या परिस्थितीत प्रत्येक कोरोना रुग्णांची ते अविरतपणे व अखंडित सेवा करत आलेले आहे. त्या सेवेचे कधीही त्यांनी कुठल्याही प्रकारचे आज पर्यंत मार्केटिंग केले नाही किंवा कुठल्याही वृत्तपत्र समूहाने त्यांच्या कार्याची किंवा रुग्णसेवेची कुठलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही. आज काही लोक एक बिस्कीट चा पुडा रुग्णांना नव्हे किंबहुना त्यांच्या नातेवाईकांना भेट देतात व त्यांचा वृत्तपत्र समूह मोठा गाजावाजा करून फोटो देऊन ते त्यांचं स्वतःचं खोटं मार्केटिंग करतात. अशा प्रकारचे प्रसंग बघितल्यानंतर माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला खूप दुःख होतं कारण रुग्णसेवक अभिलेष दादा देशमुख दिवस व रात्रीचा विचार न करता अखंडितपणे रुग्णांची सेवा करून त्यांच्या सारख्या रुग्णसेवकाची कुणीही दखल घेत नाही...
या गोष्टीच मला खूप वाईट वाटत...
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगायचा झाला तर दादा च्या कार्याबद्दल माझ्या कडे खर तर शब्द कमी पडतात माझी एकदा प्रकृती ठीक नव्हती त्यासाठी मी त्यांना कॉल केला पेरणीची वेळ होती पावसाळ्याचे दिवस होते दादा ला कॉल केला दादांनी हातचे शेती चे काम सोडून मला दवाखान्यात दाखल करून सतत माझ्या सोबत होते आणि आणखी एक विशेषता म्हणजे दादा नि:शुल्क सेवा देतात आणि गरज पडलीच तर ते रुग्णांना मदतीचा हात सुधा देतात. (फुल नाही तर फुलाची पाकळी) 
आजकाल ज्या लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मिळणारा दुर्धर आजाराचा निधी बद्दल कुठलीही कल्पना नाही.ते लोक आज स्वतःला विविध वृत्तपत्रात व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करून खोटा आव आणतात ही आजची वास्तव स्थिती आहे.
सलाम रुग्णसेवक अभिलेष दादा तुमच्या कार्याला...!
✒️- गौरव गंगाधरराव ढोरे
     मु.पो.चांदूर ढोरे ता.तिवसा जि.अमरावती
📞73979 06413

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code