प्रसन्न पहाटे, दारी सडा सारवण.
मातीच्या भिंती, मायेचा गिलावा,
झोपडीचे महाल, आपुलकीचा ओलावा.
गोठ्यात हंबर, शेणा - मुताचा वास,
दुधा,तुपाचे मडके, अन्नपूर्णेचा निवास.
पारावर गप्पा, टाळ, मृदुंगाचा गजर,
शाळेची किलबिल, बंधुभावाने आदर.
हिरवीगार शेते, रानभरी धून,
देखणा उत्सव, पिके मखमल पांघरून.
विहिरीच पाणी, गोड पाण्याचे झरे,
आम्रतरूंच्या राई, तृर्षात पाखरे.
"विषाणूच्या'' सावटाखाली,काळजाचा ठेका चुकतोय,
माणुसकीनं नांदणार, गावं माझं परत मागतोय.
●●●
■■ सतिश कोंडू खरात
वाशिम
0 टिप्पण्या