Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सरासरी...!

       आपल्या अवतीभवती चे जग खूपच वेगवान झाले आहे.सर्वच जण आपापल्या कामात खूपच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.मानवी समाज दिवसेंदिवस प्रगतीपथावर असतो,नव्हे तर तो असायला च पाहिजे.प्रगतिशील राहणे ,असणे हे स्थित्यंतर विकासाचे प्रतीक असते.असे असणे हे सुद्धा प्रवाहित जीवनाचे लक्षण आहे.
        आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले ध्येय,आपल्या प्रगती मोजण्याच्या फुटपट्ट्या आपणच बदलून टाकल्या आहेत.आपल्या भारत देशात जागतिकीकरण नंतर अनेक बदल झाले.आपण जगाच्या खूप जवळ गेलो.जग आपल्या जवळ आले.विविध देशातील लोक,त्यांच्या संस्कृती, त्यांच्या जीवनपद्धती शी आपला जवळुन संबंध येऊ लागला.आपली माणस सुद्धा आपल्या शी त्यांची जीवनपद्धती पडताळून पाहू लागली.
येनकेनप्रकारे संपत्ती गोळा करून त्या संपत्ती चा उपभोग घेण्याकडे लोकांची ,नवशिक्षित लोकांची मानसिकता झुकू लागली.त्या लोकांचे व्यवहार बघून सर्वसामान्य माणसे सुद्धा आपण ही तीच जीवनपद्धती का अवलंबू नये,,अशी विचारणा करू लागली.
एखाद्या सर्वसामान्य व्यवहारात सुद्धा 'मी त्याला कसं फसवलं,त्याला कस गंडवल,,म्हणून माणसे खुश होऊ लागली.'स्वतःला शाबासकी देऊ लागली.आपल्या कामांमध्ये कुचराई करून आम्ही इतरांना कसे फसवले,,आम्ही फसणाऱ्या पेक्षा कसे  हुशार आहोत म्हणून स्वतःच खुश होऊ लागली.
        आपण बाजारात गेल्यावर जर एखाद्या विक्रेत्याने आपल्याला जादा भावाने साहित्य विकल , त्यावेळी फसवल्याची भावना त्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावर दिसत असते.फसलेल्या माणसाचा तळतळाट त्याला त्रास देत असतो.मग तो माणूस फसवलेल्या उत्पन्नातून काहीतरी आनंद मिळवण्यासाठी काहीतरी करत असतो,त्यावेळी त्याला कोणीतरी तिकडे फसवतो.म्हणजेच आपण कोणाला तरी फसवून,त्रास देऊन मिळवलेल्या सुखाच्या बदल्यात आपणास कोणीतरी,कुठंतरी,कसेतरी फसवत असतोच.म्हणजेच 'सरासरी 'तीच राहते.
कामाच्या ठिकाणी,कुटुंबात,समाजात काही व्यक्ती अंगचोरपणाने काम करत असतात.100टक्के आपले योगदान देत नाहीत.पण त्यांनी अंग चोरून राखून ठेवलेले त्यांचे कष्ट,श्रम,विचार,बुद्धी निसर्ग इतरत्र कुठेतरी खर्च करायला भाग पाडतो.म्हणजेच सरासरी तेवढीच.
       म्हणून इतरांना फसवताना आपणही कुठंतरी फसणारच....ही जाणीव ठेवून प्रमाणिक पणे आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा.नाहीतरी  सरासरी  तीच राहते.मग कशाला कोणाचे मन दुखावून काही मिळवायचे...?

निलेश रामभाऊ मोरे
मु,पोस्ट मनभा
तालुका कारंजा लाड
जिल्हा वाशिम,
9637547666

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code