नागपूर : तांडा बेड्याचे शेती शेत्रातील आयात निर्यातीचे आर्थिक मॉडेल विकसित करण्यास कटिबद्ध असलेल्या अखिल भारतीय तांडा सुधार समिती आणि फार्मर , इंडियन चेंबर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमामध्ये "सहकार क्षेत्रातील तांडा विकासाचे आर्थिक उन्नतीचे मॉडेल तयार करुन गाव / तांडयाला विषमुक्त शेतीतून आधुनिक आँर्गानिक शेती कडे वाटचाल करावी लागेल असे उद्गार प्रा. मांगीलाल राठोड बीड यांनी काढले.
गाव/फार्मर प्रॉडक्ट् कंपनीच्या माध्यमातून तांड्यातील युवा उद्योजक घडविण्यासाठी गवर्मेंट आफ इंडिया कडे रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे असून त्याअंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घेऊन उद्योग उभे करता येईल. कापूस प्रक्रिया, हळदी प्रक्रिया, टेलघाणी असा विविध उद्योगासाठी शासन मदत करीत असते. यातून शेकडो युवकांना रोजगार मिळू शकतो असेही ते म्हणाले.
ग्रामविकास अधिकारी शिवाजी राठोड गोंदिया व बलदेव चव्हाण ग्रामसेवक कारंजा यांनी, घरकुल, शेततळे, जलनीती, शौचालय बांधणी, सार्वजनिक शौचालय बांधणी, गटार नाली, ट्रेकटर सबसिडी,गोठा बांधणे यासह अनेक सबसिडी ग्राम पातळीवर उपलब्ध असून सरपंच व मेंम्बर हे फायदा घेण्यात अपयशी ठरत आहे असे मत मांडले. यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेला आजपर्यंत शासनाने एक रुपयाचाही निधी उपलब्ध करून दिला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नरसिंग राठोड कलमेश्वर होते. प्रास्ताविक प्रा. सरदार राठोड यांनी तर सूत्र संचालन दत्तराव पवार नागपूर यांनी केले , तर आभार धर्मेंद्र जाधव यांनी मानले.
0 टिप्पण्या