हार्दिक शुभेच्छा/कामगार दिनी/
सदिच्छा वाणी/सर्वांनाच//१//
जीवन जगतो/ स्वत: कामगार/
घामाची ती धार/प्रामाणिक//२//
भारतात एक /शक्ती मुलाधार/
राष्ट्राचा आधार/कामगार//३//
दुजाचे ते अाेझे/घेई खांद्यावर/
सुखाचा संसार/कामगार//४//
कामगार आहे/नव्हे तो गुलाम/
स्वकष्टाचे दाम/अनमोल//५//
जीवनाचे दु:ख/करुनिया नष्ट/
शारीरिक कष्ट/रात्रंदिन//६//
सुखाचे जीवन/दु:खात शोधतो/
राबतो कष्टतो/कामगार//७//
कामगार दिन/करु नये दीन/
ठेवावी ही जाण/सर्वंनीच//८//
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.
Email Id.:-
arunbundele1@gmail.com
0 टिप्पण्या