• Tue. Jun 6th, 2023

विकासाचा बागुलबुवा..!

“आपला लोकशाहीवर खंबीर विश्वास असूनच भागणार नाही तर समता,स्वातंत्र्य आणि बंधूभाव या तत्वांचा मुळासकट नाश करणाऱ्या लोकशाहीच्या शत्रूला कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे.या प्रश्नावर सर्वांचे एकमत आहे अशी मी आशा करतो व जर तुमचे माझ्याशी सहमत असेल तर हे ओघानेच येते की,लोकशाही संस्कृतीच्या पायाचे रक्षण करण्यासाठी इतर लोकशाही देशासोबत आपण जोराने प्रयत्न केला पाहिजे.जर लोकशाही जिंवत राहिली तर तिची फळे नक्कीच आपणास लाभतील जर लोकशाही मेली तर तो आपला विनाश आहे.”

डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(खंड १८,भाग २,पान नं.४१८)
वर्तमानाचे भयचक्र दिवसेंदिवस वाढत असून देशातील बहुसंख्य नागरिकांचे जीवन मातीमोल झाले आहे.स्वप्न पेरणाऱ्या नेत्यांने अनेक माणसाचे मेंदू निकामी केले आहेत.सत्य स्वप्न लयास जाऊन दिवास्वप्न पाहणाऱ्या माणसाची जमात उदयास आली आहे.निवडणूकिच्या मेनोफँस्टात दिलेली वचने एक जुमला ठरतो आहे.विकासाचा बागुलबुवा दाखवून भारतीय नागरिकांच्या आयुष्याचे कोळसे होत आहेत.सत्तपरिवर्तनाची नशा मेंदूत शिरल्याने उन्मतपणे लोकशाही व्यवस्था खिळखिळी करत आहे.या विकृत षडयंत्रकारी विकासाने भारताचे भविष्य अंधकारमय आभासी केले आहे.आज भारत हिंदी महासागराच्या अंधाऱ्या जलचक्रात फसला आहे हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.
या देशाला अशा कावेबाजापासून वाचवायचे असेल तर डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी सांगितलेली घटनात्मक नैतिकता आपण अंगीकारली पाहिजे. संविधान सभेच्या भाषणात ग्रोटची मते विशद करतांना ते लिहितात की,”सैंवधानिक तत्वांबद्दल सर्वोच्चप्रतिचा आदरभाव ठेवून कायद्याच्या निश्चित चौकटीत राहून काम करणाऱ्या शासनाचा आदेशाचे पालन करतांना स्वतःची मते व कृती मुक्तपणे व्यक्त केली पाहिजे.आणि जनतेशी संबंधित घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांवर संयमित टीका केली पाहिजे.हे करीत असतांना विविध पक्षांच्या चढाओढीतील कटुता स्वाभाविक असली तरी संवैधानिक तत्वांबद्दलचा आदर आपल्याइतकाच विरोधकांच्याही मनात आहे असा विश्वास देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात रूजने होय.” ही सैंवधानिक नैतिकता आपण आज विसरलो म्हणून नेत्याचे खोटे बोलणे आज राजरोशपणे सुरू आहे. फसलेल्या जलचक्रातून भारतीय तरूण व आंबेडकरी विचारवंत भारताला वाचवू शकतात .देशातील बिनचेहऱ्याची मुखवटे चक्षू हरवली आहेत त्याचे चक्षू उघडले पाहिजे.शेतकरी व कामगार यांच्यासाठी लढा द्यावा लागेल.तरच देशात नव क्रांतीची मशाल प्रज्वलीत होईल.
विकास म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक ,प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय.हा विकास आज देशात दिसतो का ? बनावट विकासाचा बागुलबुवा दाखवून सत्तेसाठी माणूसकिचा लिलाव लावल्या जात आहे.विकास म्हणजे दोन चार शहरात गंगनचुंबी इमारती,चकाचक मॉल्स,स्विमिंग पुल्स,भव्यदिव्य पुतळे ,फ्लाय ओव्हर ब्रिज,मेट्रो,मोनो,समुद्रातील अजस्त्र पुतळे ,बुलेट ट्रेन हा एक संख्यात्मक विकास असला तरी गुणात्मक विकास होत नाही.जोपर्यंत सर्व भारतीयांना त्यांच्या सैंवधानिक हक्काचे अधिकार देऊन सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक व राजकीय विकास होत नाही तोपर्यंत खरा विकास मानता येणार नाही.
काय घडतं आपल्या आयुष्यात याचा थांग कुणालाच नाही.कोरोनाच्या महामारीने विकासाचे डोल पिटणाऱ्या नेतृत्वाचे दाखवायचे दात वेगळे व खायावयाचे दात वेगळे हे दिसून आले आहेत.स्वतःच्या मनोविश्वात मशगुल असणाऱ्या वर्तमान नेतृत्वाने स्वप्नमय देश बनविण्याच्या नादात माणसाना अंधातरी लोंबकाळत ठेवले आहे.प्रोटोकालचे कोणतेही नियम न पालन करणारे नेते प्रोटोकालची भाषा बोलत आहेत.यावरून विकासाचा बागुलबुवा कसा फसवा आहे हे भारतीयांनी ओळखले पाहिजे.
देश आज अग्नीज्वालेनं होरफळत असतांना भारताचे भविष्य दोलनामय स्थितीत ठेचाळत आहे.गरीब व मध्यमवर्गीय लोक बेजार झाली आहे.आरोग्य सुविधेच्या अभावाने आप्त लोकांचे तळफळून मरणे वेदनादायक होत आहेत.तरूण पिढी या महामारीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. लोकांना प्रेतांना जाळण्याची व्यवस्था नसल्याने ते प्रेतांना जलप्रवाहित करत आहेत.नदीचे जैवसंवर्धन धोक्यात आणत आहेत.याकडे अनेक सरकारे दुर्लक्ष करत आहेत.या मुळे पर्यावरणाचा आकृतीबंध खराब होत आहे.विकासाच्या नावाखाली झाडांची राजरोशपणे कटाई केल्याने हवेतील आँक्सिजनची मात्रा कमी होत आहे.विकासाचा गुजरात मॉडेल कुचकामी ठरत आहे.सेंन्ट्रल विस्टॉ प्रोजेक्टला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी देऊन भविष्यातील दिल्लीच्या प्रदूषणाला आमंत्रण दिले आहे.ट्रम्पच्या शोसाठी गरीबी दिसू नये म्हणून रस्त्यावर मोठी भिंती उभारली होती .यातून नेतृत्व कोणत्या दिशेनं विकास करतो हे समजून घेणे गरजेचे आहे.
आतातरी साऱ्या भारतीयांनो आपली जबाबदारी ओळखून कृती करावी.खोटी स्वप्नने विकणाऱ्या दुकानदाराकडून कोणतेही स्वप्न विकत घेऊ नका , स्वतःच्या डोळ्याने उघडे स्वप्न पहा या देशाला व लोकशाहीला वाचविण्याचे . नाहीतर हा विकासाचा बागुलबुवा लोकशाही व्यवस्थेला जमीनदोस्त केल्या शिवाय राहणार नाही .शेवटी हा देश तुमच्या मनगटावर तरळत आहे.आपली शक्ती एकवटून लढाईसाठी सज्ज व्हा हाच एकमेव चांगला मार्ग आहे.तूर्ताश थांबतो..!
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *