• Mon. May 29th, 2023

रमजान..…

पवित्र पावन । ईद रमजान ।
वाचतो कुराण । बंधू माझा ।।
नमाज पठण । नित्य नियमाने ।
केलेत भावाने । मनातून ।।
सत्यची बोलून । जागवतो धर्म ।
कधीच दुष्कर्म । केले नाही ।।
अल्लाह आमचा । आमचा ईश्वर ।
मनात जहर । भरू नका ।।
शुभेच्छा देऊन । धर्म पाळूयात ।
पाहू माणसात । प्रेमभाव ।।
मैत्री भावनेचा । करूया प्रसार ।
त्यागूया हत्यार । मिळुनीया ।।
मतभेद नको । हवा सुसंवाद ।
देऊ चला दाद । सत्कर्माला ।।
उपवास त्यांचा । पावन होवोत ।
तयांना मिळोत । समाधान ।।
हेचि विनवणी । अल्लाहास करू ।
सर्वजण स्मरू । मनोभावे ।।
जगवू साऱ्यांना । जगू आपणही ।
करूया दानही । गरिबांना ।।
अजु सगळ्यांचा । होऊ पाहतोय ।
सुख मागतोय । सर्वांसाठी ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा,जि. यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *