• Sat. Jun 3rd, 2023

यापासून आम्ही काय शिकलो ?

गत दोन वर्षाच्या काळात

डोकं अगदी सुन्न झालंय,
बोथड झाल्यात संवेदना,
मरनासन्न झाल्यात जाणीवा
जणू आणिबाणीसदृश्य परिस्थीती .
एका अनाम दहशतीने धस्तावलंय मन
कुणाची ही दहशत ?
का माजलाय हाहाकार समाजमनात ?
कुठेही दंगा फसाद नसताना,
देशात युद्ध सुरू नसताना,
कोरडा की ओला दुष्काळ नसतांना
स्मशानशांतता पसरलीय सर्वत्र
लोक स्वतःच कडीबंद करून घेताहेत घरात
हल्ली सारंच शब्दांपलीकडचं घडतय .
कुणीच कुणाशी धड बोलत नाही,
चर्चा , हासनं , मोकळा संवाद नाही,
मुलंही हल्ली खेळत नाहीत,
शाळा,काँलेजेस ओस पडलीत,
वयोवृद्ध लोक जीव मुठीत घेऊन पहूडले असतात एका कोठडीत .
नटून थटून कुणी लग्नाला जात नाहीत,
की आपुलकीने मरणालाही जात नाही,
मृतांच्या प्रेताला आंघोळ नाही की कोणते
सोपस्कार नाहीत,
कुणी कुणाच्या प्रेताला शिवत नाहीत .
माणूस विचाराने सोकत चाललाय की भयग्रस्त ,काहीच कळत नाही .
लिहीणारे हातही थरथरताहेत लखवा मारल्यागत,
शब्दही गोठले आहेत मेंदूत भर उन्हात .
भाषणं नाही, सभा नाही, संमेलनेही,
प्रवास नाही, आंदोलने नाहीत की कुणी रस्त्यावर गाडी-घोड्याने
अकारण फिरताना दिसत नाही
सारं कसं चिडीचुप झाल्यागत वाटतय .
काय झाले काहीच कळत नाही .
लिहायला,वाचायला जराही धीर होत नाही
उठने, जेवने, झोपने, टी.व्ही बघने, मोबाईल हुसकने ,पुन्हा जेवने, झोपने ,परत उठने
दैनंदिन हिच क्रीया-प्रतिक्रिया.
बाहेर गेलोच तर धस्तावल्यासारखे,
तो आपल्या अंगावर येणार तर नाही ना !
या भितीने कशातरी तीन-चार वस्तू पिशवीत कोंबून जिवाच्या आकांताने खुराड्यात परत यायचे आणि सुटकेचा निःश्वास सोडायचा
हल्ली असंच जगतोय आम्ही आमचं जिवन
किती दिवस असे विजनवासात काढायचे ?
कशी करावी या जगण्याची समीक्षा ?
कोणते संदर्भ मांडावेत या स्थितीला ,
काहीच मागमूस लागत नाही .
पण काहीतरी नक्कीच घडतय
एवढं मात्र खरं .
पण यापासून आम्ही काय शिकलो ?
जगणे उधार झाले
मरणे उदार झाले
आधी परीस आता
थोडे सुधार झाले
जाणे असे सग्याचे
ऐकून वार झाले
श्वासाविना जिवाला
जगणेच भार झाले
तेव्हा कठीण काळी
काही अधार झाले !
अरुण विघ्ने

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *