• Tue. Jun 6th, 2023

मोर्चा …!

आता लय झालं भौ नाटक

आमच्या मालाले भाव द्या
कास्तकारीचा खर्च निंघन
येवळा तरी हमी भाव द्या !
लय काळले मोर्चे ,आंदोलनं
पन भाव नाई मिळत कायनं
भाले करू धुर्याच्या गवताचे
बस झाले आमरन उपोषनं !
आता कास्तकार येकटा नाई
त्याच्यासंगं मोर्चात आमी येवू
गाई ,म्हैसी,बैलं, झाळं-झुळपं
तरी त्याले न्याय मिळवून देवू !
तुमी आमचे टिकास, पावळे
सब्बल अवजारं पायले नाई
शिंगाचे करू भाले, तलवारी
खुरीचे मार तुमी खाल्ले नाई !
आता संभाया तुमच्या ढे-या
अन् टेबलाखालचे भ्रष्ट हात
पुळं करा योजनाच्या फाईली
आईकनार नाई कोनती बात !
आमच्यावर तुमचा कोनताच
कायदा काम करनार नाई
आमाले कोंडनारा कोनताच
जेल अजून तरी बनला नाई !
बी बियानं मिरगाच्या आंदी
बळीच्या घरी आलं पायजे
समजून घ्या निसर्गाचं चक्र
जेगातले लोकं जगले पायजे !
जगवाचं असीन सार्यायले तं
आमचा बाप पिकवन मोती
पन थ्याकरता लागनारा खर्च
द्या लागन नगदी त्याच्या हाती !
– अरुण विघ्ने
रोहणा,आर्वी

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “मोर्चा …!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *