बा वामन दा ….

बा वामन दा

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
तुझे गीत मी गातो
कारण तू पेरलेस
बुद्धाच्या मातीत
प्रज्ञा शील करुणेचे गीत
तू पेरलेस
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या
समतेचे मित …..
बा वामन दा
तू पेरलास
बा भीमाचा तुझ्या
गीतातून
स्वातंत्र्य समता
बंधुत्वाचा लढा…..
बा वामन दा
तू पेरलास
भीमसूर्याचा स्वाभिमान
आत्मभान
जागविणारा
स्वयंम प्रकाशित सूर्य…..
बा वामन दा
तू झिजलास
प्रबोधनाच्या शब्द
मशाली पेटवून
तू लोकशाहीर गीतकार
महाकवी
तू आंबेडकरी चळवळीतीचा
जीवन्त श्वास……
बा वामन दा
तू तथागताची वाणी
आंबेडकरी प्रतिभेचा
वादळ वारा
तुझ्याच शब्दात वाहतो
तुज आज आदरांजली ….
जिथे आसवांची,
फुले ही गळावी
समाधिकडे त्या ,
वाट ही वळावी
वामन मला तू जाळशील जेंव्हा
समाधीपुढे त्या चिता ही जळावी
– राजेंद्र क. भटकर
बडनेरा