फुले आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सन्मानपत्र वितरण सोहळा संपन्

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

*राज्यभरातून २०० विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग*

*विद्यार्थी गुणवत्ता मंचचा अभिनव उपक्रम*
(गौरव धवणे)
अमरावती : विद्यार्थी गुणवत्ता विकास मंच महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित उत्सव महामानवांचा या उपक्रमा अंतर्गत महात्मा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत संपुर्ण राज्यातून १७५ विद्यार्थी व २५ शिक्षक असे २०० स्पर्धेकांनी सहभाग घेतला काल या स्पर्धेचा सन्मानपत्र वितरण सोहळा आॅनलाईन संपन्न झाला.
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून योगाचार्य हभप नवनाथ बोराडे जिल्हा सिंधुदुर्ग हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी देवरावचव्हाण सर व महादेव निमकर सर हे उपस्थित होते या मध्ये एकूण ४ गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती वर्ग१ते ४ चा गट वर्ग ५ते ७ चा गट वर्ग ८ते१०चा गट व शिक्षक गट अशा चार गटात ही स्पर्धा झाली यामध्य ८ते१० गटात उदय निस्वाडे अमरावती साक्षीलोणकर पुणे प्रथम क्रमांक तर ऋग्वेदी परीट सांगली न छाया चव्हाण मुंबई द्वितीय क्रमांक तर साक्षी तागडे बीड आरती बटगी पुणे तृतीय क्रमांक नेहा शिंगोटे पुणे विशेष प्रोत्साहन व ज्ञानेश्वरी लेंडे नागपूर सुलोचना पवार मुंबई अदिती पाटील यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर वर्ग ५ ते ७ गटात तन्मय तुळजीराम शिंदे बीडव समिक्षा साळुंखे सांगली प्रथम क्रमांक पायल खुळे पुणे सान्वी कोल्हटकर द्वितीय क्रमांक सोनल सोनुले यवतमाळ वसुंधरा वाकुरेमुंबई सिध्देश खैरनार पुणे यांचा तृतीय क्रमांक विशेष प्रोत्साहनपरमध्ये अनुष्का बदुकले यवतमाळ व पौर्णिमा साबळे ठाणे व प्रोत्साहन पुरस्कारानेजान्हवी मोरझडे नागपूर व जान्हवी घरत पालघर यांना सन्मानित करण्यात आले वर्ग १ते४ गटात देविका बल्लाळ कोल्हापूर निषिध अलोणेयवतमाळ द्वितीय श्रावणी पाटील सांगली तृतीय व प्रोत्साहन पुरस्काराने अनुज चव्हाण पुणे सई जेथे बीड सर्वाथ शेटे तुळजापूर यांना सन्मानित करण्यात आले तर शिक्षक गटात जिंतेद्र लोकरे सांगली प्रथम क्रमांक राहुल खरात पुणे द्वितीय करूणा पाटील यवतमाळ तृतीय
व भाग्यश्री जाधव नांदेड सोनल बेले यवतमाळ यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या क्रायक्रमाचे संचलन राज्यसंयोजिका शितल दुधे यांनी केले प्रास्ताविक वंदना कोषटवार जिल्हा संयोजिका यवतमाळ तरआभारप्रदर्शन सुमन सायमोते जिल्हामुंबई यांनी केले.
कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक महादेव निमकर देवराव चव्हाण, शितल दुधे व सर्व जिल्हा संयोजक होते.