• Fri. Jun 9th, 2023

प्रकाशमान

बाणा स्वाभिमानी
माणूस संधाता ।
कर्माचा सागर
 विचारांचा नेता ।।
सामान्यांचा साथी
अन्यायाचा काल ।
मदतीचा हात
गरिबांची ढाल ।।
मनमिळावूचे
माणुसकी मर्म ।
एकत्र आणिले
 सारे जाती-धर्म ।।
दाता मन मोठे
 सकलांचा प्यारा ।
कल्पक बुद्धीचा
नेता जगान्यारा ।।
शब्दाचा माणूस
 मनी एक ध्यास ।
सहकारातून केला
क्षेत्राचा विकास ।।
अचाट कर्तृत्व
 ठेंगणे आकाश ।
सार्थ ठरविले
 नाम ते प्रकाश ।।
*दादा* अमुचा प्राण
कारंज्याची शान ।
साऱ्यांनाच तुमचा
 होता अती अभिमान ।।
– प्रा. आर. के. वरघट
करजगाव ता. दारव्हा
 जि. यवतमाळ

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *