Contents hide
अमरावती : एक आदर्श व अनेक सुसंस्कारित पिढ्या घडविणारे, कर्तबगार शिक्षक, शिस्त,आचरण,सेवाभावी वृत्ती, समर्पण, विद्यार्थी निष्ठा, सुजान, सक्षम नागरिक घडविणारे आदरणीय गुरूवर्य श्री. नथ्थुसिंग प्रभुसिंग चव्हाण गुरूजी यांचे बुधवार दि.५/५/२०२१ रोजी रात्री २.०० वाजता अल्प आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्नुषा, एक मुलगी, जावाई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
करजगांव येथे त्यांच्यावर स्मशानभूमी अंत्यविधी झाला. आठवणीतील करजगांव समुहातील अनेक मान्यवर सदस्यांनी आपल्या शोकसंवेदनातून त्यांच्या कुटुंबाना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो. अशा शोकभावना व्यक्त केल्यात.