• Mon. Jun 5th, 2023

खरंच कामगार सुखी आहे काय?

खरंच कामगार स्वतंत्र्य तरी आहे काय?त्यांना न्यायालयानुसार अभय दिलेले आहे काय?खरंच न्यायालयातून कामगारांना न्याय तरी मिळतो काय?या सर्व प्रश्नांचं उक्तर नाही असेच येईल.
 आज देशात कामगार दिसतात.उन्हातान्हात राबत असलेले कामगार.सकाळपासून तर दिवसभर गरम भट्टीसमोर ही राबत असलेले कामगार दिसतात.तसेच त्यांचे श्रम विकून त्यांच्याच भरवश्यावर काम न करता तसेच जास्त श्रम न करता गर्भश्रीमंत बनलेलेही भांडवलदार आपल्याला दिसतात.यांना उन्हातान्हात काम करुन काही मिळत नाही.भट्टीत राबून ही काही मिळत नाही आणि त्यांना एसीच्या आलीशान कम-यात बसून सारंकाही मिळते.पण तरीही ते ते कामगार खुश तर आम्हीही खुश असे कधीच मानत नाही.हीच कामगारांची वास्तविकता आहे. कामगारांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पृथ्वी कामगारांच्या तळहातावर उभी असल्याचं मत विचारवंत मांडतात.ते खरं आहे.पण बदल्यात कामगारांना काही मिळत नाही.उलट कँन्सर,श्वसनाचे आजार.सततच्या दिवट्यांची पाळी बदलल्याने पोटाचे विकार होतात नव्हे तर निरनिराळ्या आजारांनी हे कामगार त्रस्त असतात.
 १ मे जागतिक कामगार दिन.देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा झाला.महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मीती करण्यात आली.नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं.
१मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.का साजरा करण्यात येतो.त्याही पाठीमागे कारणं आहे.जागतिक दर्जाचे इग्लंड,डच,पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली.याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन.अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले.त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं.शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते.त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला.जे अविकसित देश होते.यात कारण होतं,पैसा जास्तीत जास्त कमावणे व उद्योगाचा प्रसार करणे.तसेच आपल्या देशाचा औद्योगिक विकास करणे.असले उद्योग धंदे अविकसित भागात उभारले जात होते.जसे अमेरीका भारत.याच भारतातील व अमेरिकेतील कच्चा माल ते कमी दामात घेवून जात आणि पक्का माल या देशात आणुन विकत.
महत्वाचे म्हणजे या भांडवलदारांना उद्योगात जास्त फायदा झाला कारण मजुरांचे कामाचे तास.मजुरांच्या कामाचे तास ठरलेले नव्हते.ते बारा बारा तास काम करीत.बदल्यात सुट्ट्याही मिळत नव्हत्या.तसेच वेतनही अत्यल्प होते.त्यामुळे साहजीकच कामगार संतापले आणि त्यांनी क्रांती केली.तीच औद्योगिक क्रांती होय.या क्रांतीनुसार कामगारांच्याही स्वप्नाचा एक दिवस असावा.तो दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा हे ठरले.यानुसार १मे १८९१ मध्ये पहिला कामगार दिवस साजरा करण्यात आला.भारतात मात्र हा कामगार दिन १मे १९२३ ला साजरा केला गेला.या पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर याने मद्रास इथे केले लालबावटा ही निशाणी होती.तसेच हा कार्यक्रम मद्रास उच्च न्यायालयासमोर साजरा झाला होता.तसेच हा कार्यक्रम लेबर किसान पार्टी हिंदुस्तान संघटनेने साजरा केला.
 कामगार दिनाच्या निमित्याने या दिवशी संपुर्ण कामगारांना सुटी असते.ते या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करतात.
विशेषतः ज्यावेळी म्हणजे १८९१ ला कामगार दिनाची स्थापना झाली.त्यावेळी या कामगार दिनाच्या दिवशी खालील गोष्टीची शपथही घेण्यात आली.चौदा वर्षे वयाखालील मुलांना कामाला ठेवू नये.कामगारांच्या कामाचे तास बारा वरुन आठ तास करावे.महिलांना कामगार म्हणून विशेष सुट असावी.रात्रपाळीतील कामगारांसाठी वेगळे नियम असावे.कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास समान काम व वेतन असावे.नव्हे तर त्याबाबतीत कायदाही करण्यात आला.त्यानुसार कर्मचारी(कामगार)वागायला लागले.कामगार युनियन तयार झाली.
 आज जगात कामगार युनियन आहे.पण सक्षम असल्यासारखी वाटत नाही.कामगार दिनी ठरविण्यात आलेले सर्व नियम आज भांडवलदारांनी धाब्यावर बसवले आहेत अर्थात पाळले जात नाही.चौदा वर्षे वयाखालील बालके आजही काम करतांना दिसतात आणि दिसणार का नाही?कधीकधी त्यांची काम करण्यामागे मजबूरीही असते.जर लहाणपणी मायबाप अपघातात मरण पावलीत तर ते आपले पोट कसे भरतील?त्यामुळे साहजीकच या कामगार नियमाला मर्यादा पडतात.तसेच काही लोकं मजबुरीनं लहान मुलांना राबवितात आहेत.
 आम्ही लहान मुले जेव्हा राबतांना पाहतो.तेव्हा आमच्यात दया करुणा निर्माण होते.पण त्यांच्यासाठी आम्ही का करु शकतो?एक उदाहरण देतो.यवतमाळ जिल्ह्यात एका गावी एका शेतक-याला पीक न झाल्याने त्याने आत्महत्या केली.घरी त्याच मानसिक धक्क्याने आई आजारी पडली.घरी एक लहान बहिण तीही दुध पिती होती.त्यामुळे परीवार सांभाळण्यासाठी त्या लहान मुलाला काम करावे लागेल की नाही.तो घरी स्वयंपाक बनवायचा आणि आपल्या लहान बहिणीलाही चारायचा.तसेच घरी असलेल्या बकरीचे दूध काढून ते दूध ते विकून आलेल्या पैशातून तो घर चालवायचा.आईला त्रास द्यायचा नाही.दुपारी बक-यांना रानात चारायला न्यायचा आणि सोबत बहिणीला घेवून जायचा.कारण आई बेडपेशंट झाली होती.यवतमाळच्या कांचनताईने हे दृश्य जेव्हा पाहिले.तेव्हा तिचे ह्रृदय द्रवले.तिने त्याला दत्तक घेतले.त्याचबरोबर त्या परीवारालाही आणि सर्वे सुरु केला..मनात निश्चयही की आता आपण या लेकरांसाठी जगायचंय.सर्वेक्षणानुसार तिला जे जे मुलं सापडली त्या त्या मुलांची ती धात्री बनली नव्हे तर आजही ती त्या मुलांचे पालकत्व घेवून जगते आहे.त्यांनाही जगवते आहे.पण कोणत्याच कामाला पाठवीत नाही.हे ती करत असलेली महान कार्य होय.त्यासाठी तिने स्वतःजवळची पाच एकर शेतीही विकलेली आहे.आम्ही मात्र त्याचा विचार न करता केवळ लहान बालकाच्या कामावर बोट ठेवतो.त्यांच्यासाठी काही करीत नाही.आपल्याला कळवळा आहे त्या बालकांबद्दल.मनात दयाही येते.पण आपल्याला त्या सेवेत मर्यादा येतात.प्रथम आम्ही आमचा परीवार पाहतो.माझी पत्नी माझी मुले काय म्हणतील हा पहिला प्रश्न.जिथे आम्ही आमच्या म्हाता-या आईवडीलांचं करु शकत नाही.त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतो.त्यात या अशा बालकांचं काय?आम्ही एका पोराची जबाबदारी स्विकारु शकत नाही.तिथे ही तर एवढी मुलं.आम्हाला कौतूक आहे कामगारदिनाचं…… नेर येथील कांचनताई मात्र तसे बोट ठेवत नाही.ती निःस्वार्थ हेतूनं या बालकांची सेवा करते.निव्वळ बोलत नाही.
कामगार दिवसाच्या निमित्याने महिलांसाठीही कायदे बनवले.पण खरंच आज महिला कामगार तरी सुखी आहेत काय?आज महिला कामगारांना भांडवलदाराच्या इशा-यावर नाचावं लागतं.भांडवलगारांनी जे म्हटलं ते त्यांना करावं लागतं.भांडवलदारही या महिलांवर लैंगीक अत्याचार करतात.बिचा-या महिला त्या अत्याचाराला सहन करीत आपलं काम करीत असते.नव्हे तर कधीकधी त्यांना स्वतःची इज्जतही वेशीवर टांगावी लागते.काही काही ठिकाणी तर कामाचे आठ तास ठरवून दिलेले असतांनाही कामगारांकडून बारा ते पंधरा तास काम घेतलं जातं.कामगारांनाही मजबुरीनं ते काम करावंच लागतं.
आज देशातील परीस्थिती समान काम आणि समान वेतनाची दिसत नाही.एकाच कामासाठी वेगवेगळा पगार कामगारांना आहे.त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार रोजच होत असतात.न्यायालयात कामगार कायद्याअंतर्गत कामगारांनी आंदोलन केल्यास वा न्यायालयात दाद मागतल्यास त्या कामगारांना कामावरुन काढून टाकले जाते.साक्षीदारासह न्यायाधीश, वकील यांना विकत घेवून न्यायदान पलटवलं जातं.
१८९१ मध्ये जाहीर केलेल्या नियमानुसार ८० देशांनी कामगार दिनाची सुटी कामगारांचा गौरव म्हणून जाहिर केली नव्हे तर या दिवशी उत्कृष्ट कार्य करणा-यांचा गौरव केला गेला.पण आज याच कामगार दिनी आम्ही कामगारांना सुटी न घेता कामावर जातांना पाहतो आहे.देशातील वाढत्या महागाईने आपल्या परीवाराची उपासमार होवू नये म्हणून राबतांना पाहतो आहे.तेव्हा असे वाटायला लागते की कामगार दिन या कामगारांसाठी आहे की या देशात राज करणा-या भांडवलदारांसाठी.साधा सुज्ञ सुशिक्षित वर्ग जिथे या कामगार दिनी सुटी उपभोगत नाही.तिथे सामान्यांचे काय?असेही प्रश्न मनात घिरट्या घालतांना मन कसं विचलीत होतं.हे न सांगीतलेलं बरं.तरीही आम्ही कामगार दिवस साजरा करतो.कळत न कळत महाराष्ट्रदिन समजून…….हा आमच्यासाठी भाग्योदय असला तरी इतर राज्यासाठी नाही.इतर राज्यासाठी हा कामगार दिन आजही कामगार दिनाचं राजकारणच आहे हे न सांगीतलेलं बरं.
देशातलं सरकार मात्र कामगारांच्या सुखासाठी सर्व कार्य करीत असल्याचा कांगावा निर्माण करते.त्यांच्या मनात एक आणि कर्तृत्वात एक असे कधीकधी जाणवते.हे सरकारही कामगारांचं एकतर्फी शोषन करतांना दिसते.नव्हे तर देशातही महागाई भुमितीय पद्धतीने वाढत असली तरी वेतन मात्र भुमितीय पद्धतीने वाढत नाही.ते बीजगणितीय पद् धतीने वाढते.ऐन निवडणुकीच्या काळात वेतनआयोग मंजूर होतात.निवडणूक संपली की बस कामगारांना कोणीही ओळखत नाहीत.स्वतःचे वेतन मात्र हे आमदार खासदार दुपटी तिपटीने वाढवून घेतात.हीच कामगारांच्या बाबतीतली खरी शोकांतिका आहे.
 जग तीन गोष्टीवर आधारले आहे.किसान,कामगार आणि सैनिक.त्यापैकी राबणारे हात(कामगार)जर आपल्याजवळ नसेल तर आपल्या देशाचा विकास होवू शकणार नाही.हे लक्षात घ्यायला हवं.जर का हे हात आपल्याजवळ नसेतील तर हा देश केव्हाचाच संपेल.
आज जगात कामगार आहेत.पण उद्योग धंदे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.प्रत्येक हाताला काम नाही.बेरोजगारी वाढत चाललेली आहे.काम नसल्यामुळे व पोट जगवता येत नसल्याने बेरोजगार आत्महत्या करुन मोकळे होत आहेत.राजकारणी मात्र मजेत आहे.हेच का कामगारांसाठी असलेलं मुक्त स्वातंत्र.कामगार स्वतंत्र्य तरी आहे काय?यावर प्रश्नचिन्ह उभं राहात आहे.कारखान्यात कामगारांचा नुसता छळ.कामगारांने जर का मालकांच्या विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला कारखान्याच्या भट्टीत टाकलं जातं.नव नव महिने या कामगारांकडून फक्त आश्वासन देवु देवु काम केलं जातं.करुन घेतलं जात.पण बदल्यात काहीच मिळत नाही.हाच का कामगार दिन.
१मे ला कामगार दिन साजरा झाला.कामगारांनी जल्लोशात हा दिवस साजरा केला.पण त्यांच्या स्वातंत्र्याचं काय?त्याच्या श्रमाच्या भरवश्यावर ते कारखानदार अल्पावधीत खुप श्रीमंत बनतात.पण यांना काय मिळतं?मजबुरीनं लहान बालकांचेही श्रम विकत घेतले जातात.बदल्यात काय मिळतं?फक्त पोटभर जेवण.खानावळीत काम करणारे आमचे मजूर बंधू त्या ठिकाणी काम करुन थकतात आणि तेथील जेवण जेवतात.शेवटी महिना भरल्यावर हा मजूर मालकाला पैसे मागायला जेव्हा जातो.तेव्हा त्याला मालक पैसे न देता म्हणतो,
“तुनं जेवणच तर तुला ठरवून दिलेल्या पैशापेक्षा जास्त केलं.तु राहिला.जेवण केलं आणि आता उलट पैसे मागतो काय?” त्याला उलट सुलट बोलणे जाते.त्याचे श्रम मौलवान नसतात.त्यावेळी.प्रसंगी काही बोलल्यास धक्के मारुन त्या कामगारांना हाटेलबाहेर फेकलं जातं.कधी मारलंही जातं.कधी खुनंही……हीच वास्तविकता आहे कामगारांची.खरंच त्याचवेळी वाटते की कामगार बनू नये.मालक बनावं.पण प्रत्येकच व्यक्ती मालक कसा बनणार?कोणाला ना कोणाला कामगार बनावंच लागेल ना.
 सरकारने कामगारांची गरज लक्षात घ्यायला हवी.त्यांनाही जगण्याचा हक्क आहे हे ही लक्षात घ्यायला हवं.तसेच त्यांची दखल घ्यायला हवी.त्यासाठी जुन्या कायद्यात संशोधन व्हायला हवं.जो कोणी कामगारांवर अत्याचार करीत असेल,त्याला धडा शिकविण्याचे तंत्र कायद्यात असावे.कायद्यानुसार भांडवलदारांना दंडाची शिक्षा नसावी.तर सजेचं प्रावधान असावं कारण भांडवलदारांजवळ पैसा जास्त असतो.कामगारांना राबवून जमा केलेला.ते दंडाची रक्कम सहज न्यायालयात भरु शकतात.पण जर का सजेचं प्रावधान असलं तर थोडे का होईना भांडवलदार सुधारतील व कामगारांनाही न्याय मिळेल.
अंकुश शिंगाडे
९९२३७४७४८२

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *