Contents hide
रयत शिक्षण। संस्थेची स्थापना।
विद्या बहुजना। मिळतसे॥१॥
भाऊराव एक। युग कर्मवीर।
विद्यार्थी आधार। जगण्याचा॥२॥
ग्रामा नि ग्रामात।गंगा शिक्षणाची।
रात तिमिराची । प्रकाशित ॥३॥
शाळेशाळेतून। पेटविल्या वाती।
विद्यार्थी प्रगती। सर्वागीण॥४॥
रयत शिक्षण। हेच ज्ञानपीठ।
हेच विद्यापीठ। साता~यात॥५॥
शाहू नि फुलेंचे।समानता तत्त्व।
जीवनाचे सत्त्व।कर्मवीर ॥६॥
शाळे नि शाळेत। गुरू बहुजन।
प्रशिक्षणातून। घडविला॥७॥
कर्मवीरांना हे। आज स्मृतिदिनी।
वंदन करांनी। कोटी कोटी॥८॥
– प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती(महाराष्ट्र).
भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.
Email ID :-
arunbundele1@gmail.com