Contents hide
(स्वाती इंगळे)
पिंपळखुटा प्रतिनीधी :
कर्तव्य भावना तसेच जबाबदारीचे भान असलेल्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि गावकरी एकत्र आले तर काय होऊ शकते? याचा आदर्श वस्तुपाठ धामंणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर ग्रामवासियांनी घालून दिला आहे.
धामंणगाव रेल्वे तालुक्यात एकुण ८७ गावे आहेत त्यापैकी केवळ चार गावे अशी आहेत, ज्याठिकानी दुसर्या लाटेतील कोरोना चा प्रादुर्भाव पोहचु शकला नाही, त्या चार गावापैकी एक गाव म्हणजे चिंचपुर आहे.
गावाचे नवनिर्वाचित सरपंच चंद्रशेखर रूपरावजी कडु, उपसरपंच श्रीमती शिलाबाई अरुण चिकराम, सौ. धनश्री सोमेश्वर ठाकरे सदस्य, सौ.अर्चना संतोष लाबाडे सदस्य, श्री विलास धारणे सदस्य, अनिता गायनर सदस्य, शिशिर शेंन्डे सदस्य, मिलिंद शेंन्डे सदस्य, सौ रंजना दिलीप मढवे ग्रामपंचायत इतर कर्मचारी दिलिप धारणे, दिलिप लांबाडे, तलाठी कार्यालय पटवारी लाड, कर्मचारी मनोज लांबाडे, ग्रामसेवक राऊत, पोलिस पाटील दादारावजी महात्मे व माणिक शेन्डे गावातील इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक या सर्व मंडळीनी मिळून गावाला कोरोनापासुन दूर ठेवण्याचा विळा उचलला होता. नागरीकांनी सुद्धा जबाबदारी ओळखून योग्य व आवश्यक सहकार्य केल्यामुळे असे यश प्राप्त झाले आहे. स्थानिक आशा कर्मचारी आणि तालुक्याच्या ठिकाणाहुन आलेल्या आरोग्य पथकाने वेळोवेळी घेतलेली आरोग्याविषयक शिबिरे त्यासाठी कारणीभुत ठरली आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात नऊ सदस्विय ग्रामपंचायत आहे. येथे विविध समूहाचे लोक राहतात शेतकरी, शेतमजुर, छोटे व्यावसायिक, सरकारी नोकरदार, खाजगी कर्मचारी अशी समिश्र वर्गवारीची ही लोकवस्ती आहे. परंतु गावाच्या सुरक्षेबाबत सर्वांचे एकमत असल्याकारणाने कोरोनापासुनचा बचाव शक्य झाला. गावात सोडियम हायड्राक्साइड व इतर रासायनांची फवारणी केली जाते. सांडपाण्याचा योग्य निचरा दैनदिनी स्वच्छतेकडे जाणिवपुर्व लक्ष पुरवल्यामुळे हे गाव अगदी स्वच्छ आहे. शाळा ईमारत दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते नाल्या, स्वच्छ राखल्या जातात त्यामुळे गावात इतर रोगराई पसरत नाही. कोरोणा काळात शिस्त आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांची अमंलबजावणी यामुळे आम्ही हे यश कायम राखु शकलो, असे ग्रामपंचायत प्रशासकाचे म्हणणे आहे.
आरटीपिसीआर चाचणी शिबिर –
कुणालाही कोरोणाची लागन झाली नसली तरी नागरीकांनी स्वत:हुन सोमवारी गावात सुरु असलेल्या केंद्रावर चाचणी करुन घेतली अजंनसिंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी तुरकाने प्रयोग शाळा तंत्रज्ञ मनिषा निबुलकर ज्यांची आरोग्यविषयक दृष्टिने नेहमी चिंचपुर गावात २४ तास सेवा देतात व या कोरोणाच्या काळात ज्यांनी खरोखर सेवा केली असे आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक अरुण बाहे, तसेच आशा कर्मचारी योगिता शेंदुरसे व अल्का शेंदुरजणे आदीनी ही तपासणी केली आहे.