
मुंबई : बॉलिवूडचा अँक्शन हिरो टायगर र्शॉफची बहिण कृष्णा र्शॉफ सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे बोल्ड फोटोंज आणि व्हिडिओ शेअर करते. असाच एकदा तिने आपला बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ती चर्चेत आली. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केले. आता कृष्णा र्शॉफने या ट्रोलसंर्ना सडेतोड उत्तर दिले आहे.
कृष्णाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकीनी परिधान केलेला बोल्ड फोटो काही दिवसापूर्वी शेअर केला होता. यामध्ये तिने वाईल्ड चाईल्ड असे कॅप्शनदेखील दिले होते. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. तर काहींनी या फोटोवरून कृष्णाला ट्रोल केले. यात तिला बाई, तुमचा भाऊ टायगर किती चांगला आहे आणि तुम्ही तितकेच निर्लज्य आहात. तुम्हाला लाज वाटत नाही? तुमचे आई-वडील अशी पोस्ट पाहत नाहीत? असे म्हटले.
यानंतर ही पोस्ट वाचून कृष्णा फारच भडकली. तिने नेटकर्याला उत्तर देताना म्हणाली की, सर, तुम्ही माझी चिंता केली यासाठी तुमचे आभार; पण तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही तुम्ही शांत बसू शकता. धन्यवाद. कोणीतरी माज्या या मेसेजचे भाषांतर करू शकता का.
याआधी कृष्णाने वडील जॉकी र्शॉफ आणि भाऊ टायगर र्शॉफसोबतचे व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कृष्णा ही भाऊ टायगरसारखीच फिटनेस फ्रिक आहे.
0 टिप्पण्या