Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

बाबासाहेबानी वंचितांच्या हक्कांना संविधानातून खरे औचित्य प्राप्त करून दिले : रमेश पतंगे

नवी दिल्ली:बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या जगातील सर्वात प्रगल्भ व्याख्या असून भारतीय संविधान केवळ संहिता नसून तो सामाजिक क्रांतीचा दस्तावेज ठरतो ,असे प्रतिपादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंती निमित्त भारतीय जनसंचार संस्थेद्वारा अभिवादनपर विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रख्यात लेखक , वरिष्ठ पत्रकार श्री रमेश पतंगे यांनी केले . 'बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय संविधान निर्मितीत भूमिका ' या विषयावर बोलताना श्री रमेश पतंगे म्हणाले की भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने जगातील सर्व संविधानाचा अभ्यास केला आणि त्यातली चांगली मूल्य भारतीय संविधानात सामील केली . समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या डॉ आंबेडकरांच्या जीवन मूल्यांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते . महिलांचा सामाजिक दर्जा उंचावणे , कामांचे तास बारा वरून आठ निर्धारित करणे असो वा रिझर्व्ह बँकेची परिकल्पना ते वीज वितरणासाठी ग्रीड प्रणाली वापरण्याच्या सल्ला असो, अश्या व अनेक सशक्त राष्ट्रनिर्मितीच्या निर्णयांमध्ये बाबासाहेबांच्या भूमिकेवर प्रकाश श्री. पतंगे यांनी आपल्या वक्तव्यातून टाकला . खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार बाबासाहेब होते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थेच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख तथा शोधपत्रिका कम्युनिकेटर चे संपादक प्रा व्ही के भारती म्हणाले कि भारतात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ची प्रस्थापना करून इतिहासाचा प्रवाह बदलण्याची प्रदीर्घ लढाई लढणाऱ्या मोजक्याच भारतीय महानुभावांपैकी बाबासाहेब एक होते . प्रा भारती म्हणाले विद्यमान आर्थिक अनिश्चिततेच्या आणि जागतिक महामारी च्या परिस्तिथीत सामाजिक सुरक्षा आणि श्रम कल्याणाचे बाबासाहेबांचे विचार प्रासंगिक ठरतात . मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्यांद्वारा निर्मित बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित विषेशांकचे ऑनलाईन विमोचन या प्रसंगी अध्यक्ष प्रा व्ही के भारती यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिल्ली मुख्यालयातील आउटरीच प्रोग्राम प्रमुख डॉ प्रमोद कुमार यांनी केले . सूत्र संचालन अमरावती केंद्राचे संचालक प्रा डॉ अनिल सौमित्र यांनी तर प्रा अनिल जाधव यांनी आभार व्यक्त केले . सर्व विध्यार्थी ,प्राध्यापक आणि अधिकाऱ्यानी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code