Header Ads Widget

कोरोनाचा कहर थांंबता थांबेना..!


   
           कोरोनाचा कहर सुरुच आहे. सरकारनं लाकडाऊन लावलं तरीही कोरोना थांबायला तयार नाही.  त्यातच प्रशासन आणखी कंबर कसत आहे.
            कोरोना महामारीवर उपाय काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि आव्हान करीत आहे की घरातच राहा. बाहेर पडू नका. गर्दी टाळा. सानिटायझर वापरा. काळजी घ्या.
            सरकारच्या आदेशाची पायमल्ली न करता काही लोकं घरातच अाहेत. सानिटायझरही वापरत आहेत.तसेच तोंडाला मास्क लावत आहेत. तसेच स्वतःचीही काळजी घेत आहेत. तरीही त्यांच्या घरी कोरोना दस्तक देत आहे.
          कोरोनाचा हा कहर थांबता थांबत नाही. जरी काळजी घेतली तरी कोरोना हा त्या लोकांचं अंगणच नाही तर घर शिवतं. यातच काहींची तरुण तरुण मुलं तर काहींचे मायबापही मृत्यूमुखी पडत आहेत. एवढा कोरोना जबरदस्त आहे.
           दररोजचे आकडे पाहता कोरोना वाढत आहे. असेच दिसते. स्मशानघाटाचे निरीक्षण केले असता आज स्मशानघाट हाऊसफुल असून आज स्मशानघाटातही मुदडे जाळायला रांग लावावी लागत आहे. त्यातच स्मशानघाटाचंच चित्र तर ज्या घरी कोरोनानं माणसं मरत आहेत. त्या ठिकाणी कार्पोरेशनच्या गाड्या जावून ती माणसं त्या कोरोनानं मरणा-या माणसाला उचलतात व कच-यासारखे गाडीत टाकून त्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते. 
         आज जो तो कोरोनानं दहशतीत आहे. केव्हा कोणाला काय होईल हे काही सांगता येणं कठीण झालं आहे. कोण केव्हा मृत्यूच्या दारात जाईल तेही सांगता येणे कठीण आहे. यातच काही काही लोकं हे सरकारनं लाकडाऊन लावलं तरी शुल्लक शुल्लक कारणासाठी बाहेर पडत आहेत आणि परीसरात गर्दी करतात व कोरोनाचा फैलाव करतात. ते तोंडालाही मास्क लावत नाहीत. त्यातच काही लोकं जे मास्क जुने झाले. ते मास्क कुठेही फेकून देतात. त्या मास्कला जाळत नाहीत. त्यातच त्या मास्कमध्ये कोरोनाचे जंतू असल्यानं ते जंतू प्रसारीत होतात. काही लोकं स्मशानात मुदडे तर जाळतात. शिवाय त्या मुदड्याचे जे कपडे असतात. ते कपडे जाळत नसून तेही सैरावैरा कुठेही फेकून देतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे.  हे मास्क धोकादायक आहेत. 
            महत्वाचं म्हणजे मास्क हे असे कुठेही फेकून देवू नये.  तसेच कोरोनानं मृत्यू पावलेल्या मुदड्याचे कपडे हे कुठेही फेकून न देता तेही जाळून त्याची विल्हेवाट लावावी. तसेच सरकारचे आदेश पाळावे व कुठेही फिरु नये. त्यामुळं कोरोनाच काय कोरोनाचा बापही थांबेल ही शक्यता नाकारता येत नाही.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या